दोंडाईचा येथे माजी मंत्री नारायण राणेंच्या पुतळ्याचे दहन

dondaicha-narayan-rane

गुन्हा दाखल करण्याची दोंडाईचा शहर शिवसेनेची मागणी

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा नारायण राणे यांनी एकेरी उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेत व समस्त शिवसैनिकांमधे प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे. याचाच परिणाम म्हणून दिनांक २७/१०/२०२० मंगळवारी दोंडाईचा शहर शिवसेना शाखेकडुन नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आझाद चौक येथे दहन करण्यात आले.dondaicha-shivsena

 

यावेळी दोंडाईचा पोलिस स्टेशनचे प्रभारी आय.पी.एस. अधिकारी पंकज कुमावत यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.त्यात मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असुन ते महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेचे प्रतिनिधित्व करते. तसेच करोना संकटाच्या अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत सक्षमपणे महाराष्ट्र राज्याला संकटाच्या गर्तेतुन बाहेर काढणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून तमाम जनतेचा अपमान झाला आहे.त्यामुळे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

 

यावेळी शिवसेनेचे चेतन राजपूत, शैलेश सोनार, दिपक मराठे, आबा चित्ते, राकेश पेटकर, विजय भोई, चुडामण बोरसे, देवेंद्र अहिरे, निखिल जयसिंघानी, मोहित राजानी, पंकज चैनानी, निलेश चौधरी, भुषण चौधरी यांच्यसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here