ठाणेगाव (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – येथील श्री. जगदंबा देवस्थान परिसरांमध्ये जगदंबा देवस्थान समिती आणि चिंचे हॉस्पिटल, काटोल, जिल्हा नागपूर तर्फे नवरात्री निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कोरोना महामारी संकटा मध्ये रक्ताची गरज पूर्ण करण्याकरिता गावातील तरुण मंडळी दिलीपजी भांगे, शुभम बाराई, योगेश नासरे, आशिष भांगे, राहुल मलमकर, विनायक भांगे, धर्मराज नासरे, मंगेश बगवे, जीवन चरडे, हरीश रेगे व इतर मंडळींनी रक्तदान केले. 
डॉक्टर पांडे, मोहित पवार, होमगार्ड आकाश जुक्सेनिया यासारख्या मध्यप्रदेशातून आलेल्या व आजूबाजूच्या गावातील भाविक मंडळींनीसुद्धा सहर्ष रक्तदान केले. याप्रसंगी मुक्ताबाई विद्यालय समुद्रपूर जिल्हा वर्धा संस्थापक सुधाकरराव घोडे, आणि सरपंच श्रीमती रेवतकर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष रमेशराव दलाल, सुधाकरराव घोडे, शशिकांत जाधव, प्रतापराव घाडगे, पंजाब धुर्वे व इतर देवस्थान समितीच्या पदाधिकारींनी विशेष मेहनत घेतली. रक्त संकलन करण्यासाठी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी नागपुरातील अनिल परमाळे आणि कुमारी सुहासिनी, अनुप, हर्ष, चेतन यांनी विशेष मेहनत घेतली. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी नागपुर यांनी श्री जगदंबा देवस्थान समिती ठाणेगाव आणि चिंचे हॉस्पिटल, काटोल यांचे विशेष आभार मानले.










