मोदी सरकारचा मोठा निर्णय : शेत जमिनीवरील बंदी कायम
नवी दिल्ली – देशातील कोणत्या व्यक्ती आता जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करुन तिथे स्थायिक होऊ शकते. केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. पण शेत जमीन खरेदीवरील बंदी कायम आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आम्हाला बाहेरचे उद्योग स्थापन करायचे आहेत. म्हणूनच औद्योगिक जमिनीत गुंतवणूक करण्याची गरज आहे. पण शेत जमीन फक्त राज्यातील जनतेसाठीच राहील, असं जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितलं.
यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील रहिवासीच फक्त तेथील जमीन खरेदी आणि जमीन विकू शकत होते. पण आता राज्या बाहेरील नागरिकही जमीन विकत घेऊ शकतील आणि तिथे त्यांचं काम सुरू करू शकतील.







