आजचे पंचांग, दिनविशेष, राशिभविष्य – बुधवार, दिनांक २८ ऑक्टोबर

panchang

भारतीय सौर ६ कार्तिक शके१९४२, निज आश्विन शुक्ल द्वादशी दुपारी १२.५३ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा सकाळी ९.१० पर्यंत, चंद्रराशी: मीन, सूर्यनक्षत्र : स्वाती, सूर्योदय: सकाळी ६.३८, सूर्यास्त: सायं. ६.०६, चंद्रोदय: सायं. ४.२५, चंद्रास्त: पहाटे ३.५४.

 

आजचे शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त : दुपारी ०१ वाजून ५६ मिनिटे ते ०२ वाजून ४१ मिनिटे.
निशिथ काळ : रात्रौ ११ वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे.

आजचे अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी १२ वाजेपासून ते ०१ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत.
यमगंड : सकाळी ०७ वाजून ५४ मिनिटे ते ०९ वाजून १७ मिनिटे.
गुलिक काळ : सकाळी १० वाजून ४१ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ०५ मिनिटे.
पंचक : संपूर्ण दिवस.

दिनविशेष: प्रदोष.

 

 

आजचे राशिभविष्य

मेष : आपल्या मनाप्रमाणे कामे मार्गी लागतील. नातेवाईकांचा सल्ला उपयोगी पडेल. कार्यक्षेत्रात वाढीव अधिकार प्राप्त होतील. रचनात्मक कार्यातील आवड वाढीस लागेल. मुलांच्या विवाहाची बोलणी पुढे सरकतील.
वृषभ : जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरामध्ये आनंदी वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. दिवसाच्या उत्तरार्धात थोडी धावपळ संभवते. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची वाद घालू नयेत. त्यांचा सल्ला वा मत उपयुक्त ठरू शकते.
मिथुन : जवळच्या नातेवाईकांशी गप्पा होतील. खेळ, कलेत लोकांकडून वाहवा होईल. मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. आनंदाची अनुभूती घ्याल. व्यापारी वर्गाला भागीदारीतून उत्तम लाभ मिळू शकतील. जोडीदाराचे सहकार्य मोलाचे ठरू शकेल. कर्जफेडीचा महत्त्वाचा टप्पा पार पडू शकेल.

 

कर्क : पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. अति तिखट पदार्थ टाळा. जुनी येणी वसूल होऊ शकतील. प्रलंबित कामे मार्गी लागतील. नवीन ओळखीतून चांगला लाभ मिळू शकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. सामाजिक कार्यांतून मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. प्रयत्नांची कास सोडू नये. दिवसाचा उत्तरार्ध आनंदात व्यतीत होऊ शकेल.
सिंह : आपल्या चांगल्या वर्तणुकीमुळे लोकांकडून सन्मान होईल. त्यातूनच समाधान मिळेल. जवळच्या व्यक्तींच्या भावना समजून घेऊन कृती करण्याचा प्रयत्न करावा. कार्यालयात टीम वर्कमुळे एखादे काम उत्तमरित्या यशस्वीपणे पार पडतील. समस्यांचे निराकरण होऊ शकेल. भावंडांशी असलेले नाते आणखी घट्ट होऊ शकेल.
कन्या : नोकरीमध्ये लोकांशी बोलताना विचार पक्के ठेवा. आपले मुद्दे ठामपणे मांडा. कोणत्याही वादात पडू नये. वातावरण अनुकूल ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. कार्यालयात अचानक झालेल्या बदलामुळे आश्चर्य वाटेल. एखाद्या महिला सहकाऱ्याकडून मोलाचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल.

 

तुळ : नोकरी व्यवसायात आपली चूक झाल्यास मान्य करा. निष्काळजीपणा कमी करा. ज्येष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या गाठी-भेटीचे योग. कार्यक्षेत्रात काही ना काही लाभ मिळतील. हाती घेतलेल्या कामाच्या वैधानिक आणि तांत्रिक बाबी तपासून घेणे हिताचे ठरेल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा.
वृश्चिक : व्यवसायामध्ये चलती झालेली दिसून येईल. आहाराची पथ्ये पाळा. आनंददायी दिवस. व्यवसायात एखाद्या व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल. ज्येष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या मतावर विश्वास ठेवून कार्यरत राहणे हिताचे ठरेल. कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या उत्तमरितीने पार पाडू शकाल. कौतुक, प्रशंसा होऊ शकेल.
धनु : घरामधील कामाचा उरक वाढवा. संततीकडून लाभ होतील. संमिश्र घटनांचा दिवस. जुनी देणी फेडू शकाल. कार्यक्षेत्रात आपले मत विचारात घेतले जाईल. गृहपयोगी आवश्यक वस्तूंची खरेदी करू शकाल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे. दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत सुखात, मौज-मजेत व्यतीत होऊ शकेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

 

मकर : आपले निर्णय समोरची व्यक्ति मान्य करेल. हुशारीने वागा. प्रवास लाभदायक ठरू शकतील. एखाद्या जुन्या मित्राशी संवाद होऊ शकेल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. कर्जाऊ व्यवहार टाळावेत. मुलांकडून शुभवार्ता मिळतील.
कुंभ : जोडीदाराच्या मदतीने अडकलेल्या गोष्टी पुढे सरकवा. दिवसाचा उत्तरार्ध आनंदी जाईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना यशकारक दिवस. भाग्याची उत्तम साथ लाभेल. विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ होतील. घराबाहेर पडताना इष्ट देवतेचे स्मरण शुभलाभदायक ठरू शकेल. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकेल.
मीन : लोकांवर संपूर्ण अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले कामे पुन्हा हातात घ्या. संपत्तीत वृद्धि होऊ शकेल. मान, सन्मान मिळतील. नवीन जबाबदारी येऊ शकेल. काही कारणास्तव प्रवास संभवतात. दिवसाच्या उत्तरार्धात सुखदवार्ता मिळू शकतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नोकरीतीली हितशत्रूंपासून सावध राहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here