सातारा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; तीन गुन्ह्यांचा केला उलगडा

satara-crime

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – येथील गुन्हे शाखेने विवेक मॅचिंग सेंटर नविपेठ व सोलापूर एस टी स्टँड मधून झालेले चोरी, एम आय डी सी मधील चोरी असे तिन्ही गुन्हे उघडकीस आणून त्यातील ९४.६ ग्रॅम सोन्याचे दागिने व १५७ ग्रॅम चांदिचे दागिने, ४ मोबाईल असा एकूण २,८७,000/- रूपयांचा माल हस्तगत केला.

 

दि.२०/१०/२०२० रोजी सायंकाळी ०७:४५ वा. चे सुमारास एक महिला नवीपेठेतील विवेक मॅचिंग सेंटर या दुकाना समोर आपली दुचाकी गाडी लावुन, दुचाकीवर पर्स ठेवुन, कपडे खरेदी करण्यासाठी विवेक मॅचिंग सेंटर या दुकानात गेली असता, महिलेची नजर चुकवुन काही वेळातच दुचाकीवरील पर्स चोरी झाल्याची घटना नवीपेठेत घडली होती. सदर पर्स मधून सोन्याचे दगिने, मोबाईल व बँक एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे असे एकूण ८४,१००/- रू. मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला होता. तसेच दिनांक २२/१०/२०२० रोजी महिला नामे सौ. भाग्यश्री सचिन वेताळ रा.प्लॉट नं.५ सुशिल हाऊस, सिंहगड रोड, नांदेडगाव पुणे, ह्या त्यांची आई वडिलांकडे मुरूग येथे जाण्याकरीता सोलापूर बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबले असता, अज्ञात चोरट्याने त्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, मोबाईल व इतर कागदपत्रे पर्ससह असे एकूण १,९६,९००/- रूपयांचा माल चोरून नेला होता. या दोन्ही घटनेवरून फौजदार चावडी पोलीस ठाणेस अज्ञात आरोपीतांविरूध्द अनुक्रमे गुरन ११०२/२०२० भादविक ३७९ व गुरन ११०६/२०२० भादविक ३७९ अन्वये गुन्हे दाखल आहेत.

 

त्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त साो, सोलापूर शहर श्री. अंकुश शिंदे सो व पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) श्री. बापू बांगर सो, यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत दिले होते. त्या अनुषंगाने, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो श्री. अभय डोंगरे सो, व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप सो, यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना अभिलेखावरील आरोपी तपासून गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन केले होते.

 

गुन्हे शाखेकडील सपोनि ऋषिकेश पवळ व त्यांचे पथकातील कर्मचारी यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील गुरन ११०६/२०२० भादविक ३७९ या गुन्ह्याचे तपासात मिळालेल्या बातमीनुसार मालाविषयीचा आरोपी नामे सतिश दत्ता जाधव वय २६ वर्षे, रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी नं.६, याचा शोध घेवून त्याचेकडे या गुन्हयाचा तपास कौशल्यपूर्ण करुन यातील आरोपीस अटक करून गुन्हयातील गेलेमालापैकी सुमारे ४६.६ ग्रॅम (४.६ तोळे) वजनाचे रक्कम रु. १,८६,०००/- किंमतीचे सोन्याचे दागिने, सुमारे १५७ ग्रॅम (१५.७ तोळे) वजनाचे रु.५४००/- किंमतीचे चांदीचे दागिने व रु.५००/- किंमतीचा मोबाईल असा एकूण रक्कम रु.१,९१,९००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून नमूद गुन्हयाचा उलगडा हा २ दिवसांत केलेला आहे.
तसेच गुन्हे शाखेचे सपोनि श्री. अजित कुंभार व त्यांचे पथकातील पोलीस कर्मचारी हे अभिलेखावरील पाहिजे/फरारी, तसेच माला विषयक गुन्हयातील गुन्हेगार, यांचा शोध घेणेकामी तसेच दसरा सणाचे पार्श्वभुमीवर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, मागील चार-पाच दिवसापुर्वी रात्रीच्या वेळी नवी पेठेतील विवेक मॅचिंग सेंटर दुकानाजवळ स्कुटरला ठेवलेली पर्स चोरी करणारा इसम ओंकार चाकोते हा जुनी जोडभावी पेठ येथे फिरत असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. सदर बातमी खात्रीशीर असल्याने, सपोनि अजित कुंभार व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी सापळा लावुन त्यास चौकशीकामी ताब्यात घेवून त्याचेकडे कसून चौकशी केली असता आरोपी नामे ओंकार कल्याणी चाकोते वय ३५ रा.४४९, उत्तर कसबा, सोलापूर याने फौजदार चावडी पो.स्टे सोलापूर शहर गुन्हा रजि नं. ११०२/२०२० भा.दं.वि कलम ३७९ हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेले (१) रु.७८,०००/- रु किंमतीचे एकुण ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने (२) रु. ६१००/- रु किंमतीचा मोबाईल फोन, पर्स व त्यामधील बॅकांचे ए.टी.एम कार्ड, पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे वगैरे असा एकुण ८४,१००/-रू चा मुद्येमाल पंचनाम्याने हस्तगत करण्यात करुन सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच सपोनि श्री. अजित कुंभार यांचे पथकाने एम.आय.डी.सी पो.स्टे सोलापूर शहर गुन्हा रजि नं. ११५९/२०२० भा.दं.वि कलम ३७९,४११, ३४ हा गुन्हा उघडकीस आणुन, सदर गुन्हयात आरोपी नामे १) महंमद आलम रफिक कुरेशी वय-२६ वर्षे, व्यवसायः- खाजगी नोकरी रा. बडेघर यांचे घरात भाडयाने, सुतमिल समोर अक्कलकोट रोड, सोलापूर २) लक्ष्मी शिवाजी भोसले वय-२७ वर्षे, रा. साई नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर यांना अटक करुन, सदर गुन्हयात रु. ११,०००/- किंमतीचे दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

 

अशा प्रकारे गुन्हे शाखेकडून ३ चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकूण ९४.६ ग्रॅम सोन्याचे दागिने, १५७ ग्रॅम चांदिचे दागिने, ४ मोबाईल असा एकूण २,८७,०००/- रूपयांचा माल हस्तगत केला आहे..
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, सोलापूर शहर श्री. अंकुश शिंदे साो, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) श्री.बापु बांगर, सहा.पो.आयुक्त (गुन्हे),श्री.अभय डोंगरे, वपोनि. (गुन्हे) श्री.संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ऋषिकेश पवळ सपोनि श्री अजित कुंभार, पोह.बाबर कोतवाल, पोना राकेश पाटील, संतोष फुटाणे, विजय वाळके, संदीप जावळे, विनायक बर्डे, पोकॉ. वसंत माने, सचिन बाबर, उमेश सावंत, स्वप्निल कसगावडे, समर्थ शेळवणे, म.पो.कॉ. आरती यादव, आयेशा फुलारी, चापोना. संजय काकडे, विजय निंबाळकर यांनी पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here