ठाण्यात मनसे शहर उपाध्यक्षाची तलवारीने वार करुन हत्या

rakesh-patil

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ठाण्यात उल्हासनगर मनसेच्या शहर अध्यक्षावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना ताजी असतांना, बुधवारी (दि.२८) संध्याकाळी शिवमंदिर मार्गावर मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी सपासप वार केल्याने त्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेले. दरम्यान त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

हल्ला झाल्यावर जखमी राकेश पाटील यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे. जागेच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here