व्हाट्सअप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पाठवल्या प्रकरणी आदिवासी प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

nandurbar-police

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – येथे शासकीय कामकाजासाठी तयार करण्यात आलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर अश्लील व्हिडिओ टाकण्याचा प्रताप आदिवासी प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथील एका अधिकाऱ्याने केला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की आदिवासी प्रकल्प कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक नियोजन अधिकाऱ्यांने सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास 1 मिनिट 45 सेकंदाचा अश्लील व्हिडीओ व्हाट्सअप ग्रुप वरती वरती टाकला आणि एकच खळबळ उडाली.

 

विशेष म्हणजे सध्या आदिवासी प्रकल्प अधिकारी पदभार महिला आयएएस अधिकारी यांच्याकडे असून या ग्रुप वरती अनेक अधिकारी व कर्मचारी वर्ग असल्याचे कळते. जवळपास 53 सदस्यांचा ग्रुप असून यामध्ये अनेक महिला सदस्य असल्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिक्षकांच्या तक्रारीवरून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अश्लील व्हिडीओ टाकणाऱ्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास नंदुरबार शहर पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here