बनावट बिडी विक्री करणाऱ्यावर आयपी एन्व्हेस्टीगेशन ॲण्ड डिटेक्टीव्ह सर्व्हिस प्रा.लि.ची कारवाई

shahada-crime

पोलिसांची घेतली मदत, कॉपीराईट ॲक्टखाली शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – मुंबई येथे मुख्यालय असणाऱ्या आयपी एन्व्हेस्टीगेशन ॲण्ड डिटेक्टीव्ह सर्व्हिस प्रा.लि.चे जळगाव येथे कार्यरत असणारे अधिकारी अनिल मोरे यांनी आपल्या कंपनीतर्फे बनावट मालाची तपासणी केली असता संभाजी बिडी साबळे वाघीरे आणि कंपनी यांच्या कंपनीच्या बनावट बिडी विक्री होत असलेल्या आढळून आल्या. याप्रकरणी शहादा पोलिसांमध्ये कॉपीराईट ॲक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आयपी एन्व्हेस्टीगेशन ॲण्ड डिटेक्टीव्ह सर्व्हिस प्रा.लि.चा साबळे वाघीरे आणि कंपनीशी झालेल्या करारानुसार बनावट मालाची तपासणी करण्याचा अधिकार दिला असून, या कंपनीला गुप्त बातमीदारांकडून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात भगवती किराणा यांच्या बनावट बिडी विक्री होत असल्याची माहिती मिळाली.

 

मिळालेल्या माहितीनुसार कंपनीचे जळगाव येथील प्रतिनिधी अनिल मोरे यांनी नंदुरबार येथे जावून पोलिस अधिक्षक नंदुरबार यांची भेट घेवुन त्यांना याबाबत माहिती दिली. त्यांची या प्रकरणाची तात्काळ दखल घेत, शहादा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नजन पाटील यांना योग्य ती मद्दत करण्यास सांगितले पोनि श्री नजन पाटील यांनी शहादा पोलिस स्टेशनचे कर्मचारी पोसई/ विक्रांत कचरे साहेब ,पोहेकाँ/७६५ रामा वळवी, पोकाँ/६०० दिनकर चव्हाण, पोकाँ/५३७ अनमोल राठोड यांना योग्य त्या सुचना देवुन मदतीस पाठविले. duplicate-sambhaji-bidi

 

सदर भगवती किराणा येथे धाड टाकण्यास गेले असता तेथे उपस्थित योगेश संजय मराठे (वय.१८ वर्ष, रा. राम नगर शहादा) यास ओळख देवुन दुकानाची तपासणी करण्याचे कारण सांगितले असता त्याने सहमती दर्शविल्याने पंच व पोलिस कर्मचाऱ्यांनी दुकानाची पाहणी केली असता दुकानात २७,२०० /- रु. किंमतीचे ८५० लाल रंगाचे बिडी बंडल प्रत्येक बंडलवर चौकटीत तोडाच्या कॅन्सर चे चित्र व त्यावर संभाजी बिडी साबळे वाघीरे आणि कं असे हिरव्या रंगाच्या कवर मध्ये त्यावर मराठीत छत्रपती बिडी वर्क्, संभाजी बिडी , साबळे वाघीरे आणी कंपनी कुर्ला.जी.आय.पी ट्रेडमार्क रजि.२८१२२२ असे लिहीलेले पुडे आढळून आले.

 

सदर माल बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन पंचासमक्ष जप्त करुन योगेश संजय मराठे यास ताब्यात घेवुन माल बनावट विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगतांना आढळल्याने, अनिल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचे विरुध्द काँपी राईट १९५७ चे सुधारीत अधि. व १९८४ अधि. चे कलम ६३.६५ नुसार तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here