धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – परंडा येथील व्यापाऱ्या कडून कमी दराने कापूस खरेदी करून कापुस उत्पादक शेतकर्यांची व्यापार्यांकडून आर्थिक लूट करण्यात येत असून कापसाला हमीभाव प्रमाणे तर देण्यात यावा व व्यापाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालूका अध्यक्ष नागनाथ नरूटे पाटील यांनी दिला आहे .
जिल्हाधिकारी धाराशिव यांना तहसीलदार परंडा यांच्या मार्फत दि २८ रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासणाने कापसाला प्रति क्विंटल ५५०० रुपये हमी भाव जाहीर केला आहे मात्र व्यापाऱ्या कडून ३५०० ते ४५०० रूपये दर देण्यात येत आहे .
सध्या शेतकऱ्यांची पिके अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे थोडाफार हाताला लागलेला माल व्यापाऱ्या कडून कमी दराने खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यावर उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे.
तरी कापसाची हमीभाव दराने खरेदी करून शेतकऱ्याची अडवणूक थांबवण्यात यावी व हमीभाव दरा पेक्षा कमी दराने कापुस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करतील असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदनावर परंडा तालुका अध्यक्ष नागनाथ नरूटे पाटील हनुमंत जाधव, राहुल शिंदे, महेश शिंदे, वैभव लटके , दयानंद कोकणे ,जयदीप पाटील , अमर चौधरी ,बाळासाहेब सोनवणे यांच्या स्वाक्षर्या आहेत.







