मुंबई (चित्रपट विभाग उपसंपादक सचिन देसाई) – सिंघम फेम काजल अगरवाल लग्नाच्या बंधनात अडकणार असून तिचे हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. काजल अगरवाल उद्योगपती गौतम किचलू याच्याबरोबर लग्न करत आहे. त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमाची सुरूवात हळदीच्या समारंभाने झाली. मेहंदीनंतर हळदीचा हा समारंभ काजलच्या मुंबईतील घरी पार पडला. त्यातीलच या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काजल अगरवालने गौतम किचलूसोबत लग्न करणार असल्याची घोषणा ६ ऑक्टोबर रोजी केली होती. तसेच काजलने म्हटले होते की, ‘मी लग्नाला होकार दिला आहे. मला सांगताना खूप आनंद होत आहे की, मी ३० ऑक्टोबर २०२० रोजी गौतम किचलूसोबत लग्न करणार आहे. हा एक खासगी समारंभ असून हे लग्न आमच्या कुटुंबाच्या काही खास लोकांच्या उपस्थितीत मुंबईत होणार आहे. कोरोना या महामारी कालावधीचा खेद आहे. पण नवीन प्रवास सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. फक्त तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत.
काजलने हळदी समारंभात पिवळा रंगाचा ऑऊटफिट परिधान केला असून त्यात ती सुंदर दिसत होती. यावेळी काजलचा लूक साधा आणि मोहक तर गौतम देखील देखणा दिसत होता. काजलने ऑऊटफिट फ्लोरल ज्वेलरी परिधान केली होती. त्यामुळे या सोहळ्याचे फोटो पाहण्यासारखे आहेत. काजलच्या लग्नाचा समारंभ २९ ऑक्टोबर रोजी सकाळी सुरू झाला होता. इस्टाग्रामवर तिने मेहंदी लागलेल्या हातांचे फोटो ही अपलोड केले. काजलने तिच्या मेहंदी सोहळ्यात डिझायनर अनिता डोगरे हिने डिझाईन केलेला पेस्टल ग्रीन कलरचा फ्लोरल प्रिंटेड शरारा घातला होता, यात ती खूपच सुंदर दिसत होती.
काजल आणि गौतमचे आज (३० ऑक्टोबर) लग्न होणार असून तिने आपल्या लग्नासाठी इन्स्टाग्रामवर #kajgautkitched हॅशटॅग तयार केला आहे. तर लग्नाच्या आधी संगीत समारंभ आयोजित केला जातील, ज्यामध्ये निशा, काजल आणि गौतमचे मित्र सादरीकरण करतील असे एका मुलाखतीत काजलची धाकटी बहीण निशा अगरवाल हिने सांगितले होते.







