ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ.जय जाधव, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील व सहा पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे यांनी गुटखा सेवनाचे भंयकर दुष्परिणाम विचारात घेता, अशा घातक गोष्टीपासून समाजाला वाचविण्यासाठी सामाजिक उदात्त हेतुने सर्वानी गुटखा विक्रीबाबत झिरो टॉलरन्स संकल्पना राबविण्याबाबत आदेश दिले होते.
वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे याचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/विश्वासराव बाबर, पोउपनि/सुनिल तारमळे व पोलीस अंमलदार यांनी गुप्त बातमीच्या आधारे माहीती प्राप्त करून दिनांक २९/१०/२०२० रोजी सेक्टर नं-०४,करंजाडे,ता. पनवेल, जि.रायगड येथे जावून छापा टाकला असता एका इको कार क्रमांक एम.एच ४६ ए.पी ५३५७ मध्ये प्रतिबंधीत असणारा पानमसाला व सुंगधित तंबाखुचा (गुटख्याचा) साठा मिळुन आला. 
सदरचा प्रतिबंधीत माल हा आरोपी नामे विरेंद्र बुध्दसेन गुप्ता,वय ३४ वर्ष याचा असल्याने त्यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेवुन घरझडती घेतली असता घरामध्ये सुध्दा प्रतिबंधीत मालाचा साठा व ग्राहकांना गुटखा खरेदी करण्यासाठी आमिष दाखविणेकरीता आणलेल्या एलईडी मिळून आल्याने त्याच्याविरूध्द पनवेल शहर पोलीस ठाणे गु.रजि, नं-३९४/२०२० भा.द.वि.कलम १८८,२७२,२७३,३२८ सह अन्नसुरक्षा मानदे अधिनियम २००६ मधील कलम २६ (२) (आय), २६ (२) (आय व्ही) व कलम २७ (३) (डी), २७ (३) (ई), ५९ (३) प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद देवुन गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयात आरोपी यास अटक केली असुन त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने पोउपनि/बाबर हे तपास करीत आहेत.
याप्रकरणी विरेंद्र बुध्दसेन गुप्ता, (वय ३४ वर्ष,रा रूम नं-३०२,सेक्टर नं-०४,करंजाडे,ता.पनवेल,जि.रायगड मुळ रा.मु.पो.रारी,ता.खागा,जि.फत्तेपुर,राज्य-उत्तरप्रदेश) याला अटक करुन त्याच्याकडून १,८३,६३६/- रूपये किंमतीचा सुंगधीत तंबाखु, पानमसाला, गुटख्याची पाकीटे., ५०,२३०/- रूपये रोख रक्कम, १,४७,०००/- रूपये किंमतीच्या सॅमसंग कंपनीच्या एकुण ०८ एलईडी टिव्ही, ४,००,०००/- रूपये किंमतीची इको कार (क्रमांक एम.एच ४६ ए.पी ५३५७)असा एकूण ७,८०,८६६/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाणे कडील पोलीस उप निरीक्षक/विश्वासराव बाबर, पोलीस उप निरीक्षक/सुनिल तारमळे, पोहवा/१२२० फाळके, पोना/२४४१ किरण सोनवणे, पोना/३२२४ नवनाथ शिरकुळे, पोशि/३५८३ सुनिल गर्दनमारे, पोशि/३२३९ विवेक पारासुर, मपोना/१८९१ ललीता पाटील, मपोना/२८५७ धायगुडे यांनी केली आहे.







