ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे कडुन बदलापुर पश्चिम पोलीस स्टेशन येथे दि.१२/०८/२०२० रोजी दाखल गु.रजि.नं. १०८/२०२०, भा.द.वि.स.क. ३०२ या गुन्हयाचा समांतर तपास सुरू होता. सदर गुन्हयातील मयत इसम नामे रूपेश जनार्दन पावर वय -३४ रा.रमेशवाडी बदलापुर पश्चिम याचेशी किरकोळ झालेल्या वादातुन आरोपी नामे अभिजीत बाबुराव जाधव याने रूपेश पवार याचे डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुख:पती करून त्यास जिवे ठार मारले होते. गुन्हा केल्यापासुन आजपावेतो आरोपी इसम हा फरार होता. सदर आरोपी याचे विरूध्द बदलापुर व कोल्हापुर येथे खुन,अपहरण ,खंडणी ,शस्त्र अधिनियमाअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.तो बदलापुर पुर्व पो.स्टे. गु.र.न. ५५/२०१५ भादवि ३०२,३४ या खुनाचे गुन्हयातुन जामीनावर सुटलेला असताना त्याने वरील खुनाचा गुन्हा केलेला आहे.
गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे कडुन सदरच्या गुन्हयाचा समांतर तपास सुरू असतांना इकडील घटकातील पोना/दादा पाटील यांना सदर गुन्हयातील आरोपी नामे अभिजीत जाधव हा वापी, गुजरात राज्य येथे स्वत:चे अस्तित्व लपवुन राहत असले बाबत बातमी मिळाली. सदरच्या बातमीच्या अनुषंगाने मा. वरिष्ठांची परवानगी घेवुन गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे चे पोउपनिरी/दत्तात्रय सरक व पथक आरोपीत यास ताब्यात घेणेकामी दिनांक २७/१०/२०२० रोजी विक्रमगड, वापी,सुरत, गुजरात राज्य येथे खाना केले होते. तेथे तपास केला असता बातमीदाराकडुन सदर आरोपी हा त्याचे मुळगावी कोल्हापुर येथे गेल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदरचे पथक आरोपीचे शोधकामी कोल्हापुर येथे रवाना झाले होते.
सदर पोलीस पथकाने आरोपीचा कोल्हापुर येथे कसोशीने शोध घेतला परंतु आरोपी बाबत खात्रीलायक अशी माहीती मिळुन येत नव्हती तसेच आरोपीत हा मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा शोध घेण्यास पोलीस पथकास तांत्रिकदृष्टया मोठया प्रमाणावर अडचण येत होती. तरीही सदर पथकाने आरोपीताचा शोध घेण न थांबवता कौशल्यपुर्ण व संय्यमाने आरोपीचा शोध सुरूच ठेवला. सदर आरोपीचा शोध सुरू असताना पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, आरोपी हा कोल्हापुर सोडुन अंबरनाथ येथे गेला आहे. त्यानंतर पुन्हा सदरचे पोलीस पथक कोल्हापुर येथुन अंबरनाथ ठाणे येथे येवुन आरोपीताचे ठावठिकाणाचे सदंर्भातील सर्व संभाव्य माहीतीची पडताळणी करून अथक परिश्रमाअंती गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे अभिजीत बाबराव जाधव यास अंबरनाथ एम.आय.डी.सी. येथुन दि.३०/१०/२०२० रोजी ताब्यात घेवुन सदर गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त डॉ. सुरेश कुमार मेकला, अप्पर पोलीस आयुक्त ,गुन्हे संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) दिपक देवराज, सहा. पोलीस आयुक्त (शोध-१) गुन्हे किसन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहा.पोलीस निरीक्षक अविराज कराडे, संदीप बागुल,समीर अहिरराव पो.उप.नि/दत्तात्रय सरक, पो.हवा/आनंदा भिलारे, प्रकाश कदम, अबुतालीब शेख, संभाजी मोरे, शिवाजी गायकवाड, रविदं काटकर,पो.ना/दादा पाटील, संजय बाबर, अजय साबळे, चंद्रकांत वाळुज , राहुल पवार, पो.शि/भगवान हिवरे, मपोशि/तेजश्री शेळके या पथकाने केली आहे.







