सिन्नर येथे पंधरा लाखांसाठी विवाहितेचा छळ

crime

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – पंधरा लाखांसाठी पोलीस पतीकडून विवाहितेचा छळ केल्याने पाच जणांविरुद्ध वावी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथील शेतकरी रावसाहेब दत्तात्रय रानडे यांची कन्या कांचन हिचा विवाह ३१ मे २०१९ रोजी येवला तालुक्यातील मुखेड येथील शेतकरी सुनील कारभारी आहेर यांचा मुलगा योगेश याच्याशी झाला. विवाहानंतर तीन महिने सासरच्यांनी कांचनला चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर सासू मंदाबाई सुनील आहेर यांनी बंगला बांधण्यासाठी १० लाख रुपये, तर चार चाकी गाडी घेण्यासाठी ५ लाख रूपये आई – वडिलांकडून आणण्याचा तगादा सुरू केला होता.

 

दरम्यान विवाहितेच्या घरच्यांनी यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सासरच्यांवर छळाचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here