नाशिक (विशेष प्रतिनिधी) – न्यायालयात अटकपुर्व जामीन मंजुर होण्यासाठी बनावट नोटराईज प्रामिसरी नोट तयार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कमलेश महादेव ओझे (रा. गुलश पार्क, वडाळा रोड) व रफिक इमोजद्दीन शेख (४४, रा. काडेविल चाळ, अंबरनाथ, ठाणे) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. हे दोघे एएस ऍग्री ऍण्ड अक्वा कंपनीचे संचालक आहेत.
फसवणुक प्रकरणी अटक टाळण्यासाठी त्यांनी बनावट नोटराईज प्रामिसरी नोट तयार करून न्यायालयात सादर केली. यामुळे त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







