जळगांव (संपादक सुनिल पाटील) – काल लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लेवा भवन भादली ता.जळगाव येथे स्व. निखिलदादा एकनाथरावजी खडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भेट देण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा श्री.डीगंबर पाटिल यांच्यातर्फे भेट देण्यात आला होता.
माजी मंत्री एकनाथराव खडसे जि.प.उपाध्यक्ष लालचंदभाऊ पाटील , प.स. सदस्या सौ जागृती चौधरी , श्री विजय नारखेडे , श्री अशोकभाऊ लाडवंजारी , श्री सुनिलभैय्या माळी , डॉ.अभिषेक ठाकुर , श्री चंदनभाऊ कोल्हे , रामराज्य प्रतिष्ठान सर्व संचालक मंडळ, लेवा पंच ट्रस्टच्या संचालक मंडळाचे पदाधिकारी , नारखेडे मित्रमंडळ सदस्य व परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









