फरार आरोपी पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

pune-crime

पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – गुरुवार दि २९/१०/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेत असताना वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमी वरून मौजे काटी ता इंदापूर जि पुणे येथे जाऊन चौकात सापळा रचून एक संशयित इसम ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता मदन अरुण काळे वय २९वर्षे रा जगताप मळा शेटफळ हवेली ता इंदापूर जि पुणे असे सांगितले सदरील इसम हा वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे माहे मार्च महिन्यात गु र नं ४९/२०२० भा द वी का कलम ३९४,३४ दाखल करण्यात आला होता.

 

 

सदरच्या गुन्ह्यात वरील आरोपी हा गेली ७ महिने पासून फरार होता त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे तो सांगत आहे वरील आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे

 

सदरची कारवाई ही पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पो हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा ज्ञानेश्वर क्षिरसागर, पो ना प्रवीण मोरे, पो ना अभिजित एकशिंगे, पो ना विजय कांचन, पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here