पुण्यात अल्पवयीन मुलीवर तरुणाचा बलात्कार

rape-by-police

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना याच परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

या प्रकरणी शनिवारी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणाने पीडित मुलीवर फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केला होता. त्यानंतर मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

 

या प्रकरणी एका १६ वर्षीय मुलीने तक्रार दिली असून, एका तरुणाविरोधात हडपसर पोलिसांनी बलात्कारासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार मुलगी आपल्या कुटुंबीयांबरोबर हडपसर भागात राहते. तिची एका तरुणासोबत ओळख झाली होती. याचा गैरफायदा घेत या तरुणाने या अल्पवयीन मुलीला एका लॉजमध्ये घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास वडिलांना ठार मारण्याची धमकी त्याने पीडित मुलीला दिली. त्यामुळे तिने याची वाच्यता कोठेही केली नाही. पोटात दुखू लागल्यानंतर या मुलीला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. कौटुंबिक अडचण आणि लॉकडाऊन यामुळे तक्रार करण्यास उशीर झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here