कोरोनाने घेतला एका मंत्र्याचा बळी!

doraikannu

चेन्नई – तामिळनाडूचे कृषिमंत्री आर. दोराईकन्नू यांचा कोरोनाने शनिवारी रात्री येथील कावेरी रूग्णालयात मृत्यू झाला. ते ७२ वर्षांचे होते. ते विनम्र आणि शेतकरी हिताच्या कामांसाठी ओळखले जात होते. दोराईकन्नू यांच्या मृत्यूवर राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

 

यावेळी अत्यंत दु:खासह आम्हाला कृषिमंत्री आर. दोराईकन्नू यांच्या मृत्यूची घोषणा करावी लागत असल्याचे कावेरी रूग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी एक निवेदन जाहीर करताना सांगितले. या निवेदनात, दोराईकन्नू यांनी रविवारी रात्री ११.१५ वाजता अखेरचा श्वास घेतला. या कठीण परिस्थितीत दोराईकन्नू यांच्या बद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. तसेच त्याच्या कुटूंबाबद्दल आम्ही संवेदशील आहोत.

 

दोराईकन्नू यांच्या मृत्यूवर राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी दु:ख व्यक्त करताना शोकसंदेश दिला. त्यात त्यांनी ‘दोराईकन्नू आपल्या साधेपणा, नम्रता, स्वच्छता, प्रशासकीय क्षमता आणि शेतकऱ्यांच्या भक्तीसाठी परिचित होते. त्यांच्या असे आकस्मित जाण्याने तामिळनाडू तसेच एआयएडीएमकेच्या लोकांचे न भरणारे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
दोराईकन्नू सलग तीन वेळा तंजावूर जिल्ह्यातील पपानसम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे. रविवारी त्यांची तब्येत अधिकच खालावली. त्यांना कोरोनामुळे गंभीर निमोनिया झाला असून त्याच्यांत इतर गुंतागुंतीही झाल्याचे सोमवारी रुग्णालयाने सांगितले. तसेच त्याच्या फुफ्फुसात कोरोनाचे ९०% संसर्ग पसरल्याचे सीटी स्कॅनवरून ही दिसून आला.
१३ ऑक्टोबरला मुख्यमंत्री पलानीसामी यांच्या आईच्या अंत्यदर्शनासाठी जात असताना दोराईकन्नू यांची तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना विलुपुरम येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच दिवशी खबरदारी म्हणून दोराईकन्नू यांना कावेरी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here