टक्कल उघडे पडल्यावर नववधूची पतीविरोधात पोलिसांत तक्रार

takal

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा ‘बाला’ हा हिंदी चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आयुष्मान खुराना हा आपल्या बायकोपासून टक्कल असल्याच लपवण्यासाठी विग घालत होता. पण लग्नानंतर आयुष्यमानचा खरा चेहरा उघडकीस येतो आणि मग त्याची बायको म्हणजेच परी (यामी गौतम) त्याच्यावर केस दाखल करते. परी ही केस जिंकते आणि बाळा व परीचा अखेर घटस्फोट होतो. आता तुम्ही म्हणालं हे सगळं का सांगताय? कारण असाचं काहीसा प्रकार मीरारोड येथे घडला आहे. नवऱ्याने टक्कल लपवल्यामुळे लग्नानंतर बायकोने थेट पोलीस ठाणे गाठलं आहे. मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी नवऱ्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

 

१ महिन्यापूर्वी २७ वर्षीय तरुणीसोबत मीरारोडच्या नयानगर येथे लक्ष्मीपार्कमध्ये राहणाऱ्या मोहम्मद मूर्तजा सय्यद (वय २९) याचे लग्न झाले होते. नवऱ्याचे लग्नापूर्वीपासून टक्कल होते. पण हे बायकोला माहित नव्हते. लग्नानंतर नवऱ्याला टक्कल असून तो टक्कल लपवण्यासाठी केसांचा विग वापरत आहे, हे बायकोला समजले. मग यानंतर फसवणूक झाल्याचे सांगते त्याच्यामध्ये भांडणं होऊ लागली. तसेच मोहम्मद बायकोच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तिच्या मोबाईलवर सतत नजर ठेऊ लागला.

 

हे एकाबाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला सासरची मंडळी हुंडा कमी दिला म्हणून त्रास देऊ लागली. त्यामुळे या त्रासाला आणि फसवणूकीला कंटाळून बायकोने नया नगर पोलीस ठाणे गाठलं. तिच्या तक्रावरून पोलिसांनी विविध कलामांखाली नवऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास देखील केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here