मुंबई (संपादक सुनिल पाटील) – ५९वी महाराष्ट्र राज्य हौशी राज्यनाट्य २०१९ मध्ये २१ केंद्रावर पार पडली. प्रत्येक सहभागी संस्थेला निर्मिती खर्च व दैनिक भत्ता शासनाकडून देण्यात येतो. मार्च किंवा एप्रिल महिन्यात हे पैसे मिळत असतात, परंतु ह्या वर्षी कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ते पैसे अद्याप मिळालेले नाहीत. सांस्कृतिक संचालनालयाने मंत्रालयाला सादर केलेली फाईल मंजूर झाली नव्हती.
याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत टकले यांनी व नियामक मंडळ सदस्या श्रीमती सविता मालपेकर यांची राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी लगेचच राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी बाबासाहेब पाटील, संतोष साखरे, डॉ. सुधीर निकम यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले व पैसे लवकरात लवकर देण्याची विनंती केली. नंतरही सतत पाठपुरावा केला.
आता ती फाईल मंजूर झाली असून दिवाळीपूर्वी सर्व सहभागी संस्थांना पैसे मिळणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजत आहे.







