धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथील गजेंद्र नगर येथील पप्पू भावे यांच्या फार्म हाऊसवर शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या 53 वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्ताने हॉलीबॉल स्पर्धा,आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील हे होते तर प्रमुख अतिथी प्रदेश काँग्रेसचे डी जी पाटील,भाजपा नेते डी आर पाटील,राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन,चर्मकार समाजाचे नेते भानुदास अप्पा विसावे,शिवसेनेचा जिल्हा संघटीका सौ महानंदा ताई पाटील,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रा. पी एम पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, नगराध्यक्ष निलेश चौधरी,जि.प.सदस्य गोपाल चौधरी, विष्णूभाऊ भंगाळे,शरद भाई तायडे, डॉ सुनील महाजन,जळगाव मार्केट चे सभापती चौधरी,प.स.सभापती मुकुंद नन्नवरे,गटनेते पप्पू भावे, उपनगराध्यक्षा सौ कल्पना महाजन, माजी नगराध्यक्ष सौ उषाताई वाघ, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपतालुका प्रमुख मोती पाटील,राजेंद्र ठाकरे उपस्थित होते.
या प्रसंगी भानुदास विसावे,ज्ञानेश्वर महाजन,डी जी पाटील सो,निलेश चौधरी,डी आर पाटील सर,प्रा.बी एन चौधरी यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी सांगितले की, गुलाबराव वाघ हे हाडाचे कार्यकर्ते असून पक्षाशी एकनिष्ठ आहेत मी मंत्री झाल्यानंतर 50 टक्के मतदारसंघाचे काम भाऊ करून घेतात, मी नाही गेलो तरी त्याची उणीव कार्यकर्त्यांना भासू देत नाहीत त्यांच्या या कामामुळे भविष्यात पक्ष त्याच्यावर मोठी जबाबदारी टाकेल अशी मला आशा आहे.
एका वर्षाच्या आत धरणगाव शहराच्या चेहरा मोहरा बदलून जाईल कोरोनामुळे जनजीवन मिस्कळीत झाले होते आता हळूहळू पूर्व पदावर येत आहे आमचे कार्यकर्ते कोरोनामध्ये रस्त्यावर हवी ती मदत करीत होते त्यामुळे सेनेचे 14 कधी 15 असे नगरसेवक निवडून येतात.
सत्काराला उत्तर देताना गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांच्या बळावर धरणगाव न.पा.मध्ये आमची नेहमी सत्ता येत असते आमचे कार्यकर्ते ज्याप्रमाणे आग तेथे पाण्याचा बंब तसेच काम तेथे शिवसेना कोणतेही सामाजिक कार्य असेल आमचा कार्यकरता नेहमी हजर असतो.
कोरोना काळात आमच्या कार्यकर्त्यांनी जनतेला खूप मदत केली.कोविड सेंटरमध्ये नाश्ता देणे असेल,अर्सनिक अल्बम 30 गोळ्या वाटप असतील, धान्याचे पाकीट असतील, मास्क असतील हवी ती मदत केली.भविष्यात धरणगाव न.पा.च्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज माझा जो हृदय सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

या कार्यक्रमास श्री व्यायम प्रसारक मंडळाचे सदस्य,बालाजी वाहन व्यवस्था मंडळाचे सदस्य,धरणगाव न.पा.सर्व नगरसेवक,विविध पतसंस्थेचे संचालक मंडळ,माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी, भगवान महाराज,परीट समाजाचे पदाधिकारी,व्यापारी असोशियन चे सर्व पदाधिकारी,डॉक्टर,वकील, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व सदस्य, मुख्याधिकारी जनार्दन पवार सर्व पत्रकार,राजकीय पक्षाचे पदाधिकारी,महिला मंडळ,हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी नगरसेवक अभिजित पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पी एम पाटील यांनी केले.
https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/2748969738717422/?t=0







