जन्मदात्या आईला मुलगा आणि सूनेने जिवंत पेटवून दिले

crime

शहाजहाँपूर – उत्तर प्रदेशातील शहाजहाँपूरमध्ये मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईला मुलगा आणि सूनेने जिवंत जाळले. कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. यात त्याची आई गंभीर जखमी झाली असून, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

रत्ना देवी (वय ५८) असे पीडित महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा आकाश गुप्ता आणि त्याची पत्नी दीप शिखा तसेच आकाशच्या सासू-सासऱ्यांनी महिलेला जिवंत पेटवून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

महिलेला पेटवून दिल्यानंतर ती किंचाळली. शेजाऱ्यांनी तिला वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आकाश गुप्तासह इतर दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here