भारतीय सौर १२ कार्तिक शके १९४२, निज आश्विन कृष्ण तृतीया उत्तररात्री ३.२४ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रोहिणी उत्तररात्री २.२९ पर्यंत, चंद्रराशी : वृषभ , सूर्यनक्षत्र: स्वाती, सूर्योदय: सकाळी ६.४१, सूर्यास्त: सायं. ६.०४, चंद्रोदय: रात्री ८.०३, चंद्रास्त: सकाळी ८.४८.
आजचे शुभ मुहूर्त :
अभिजित मुहूर्त : सकाळी ११ वाजून ४२ मिनिटे ते १२ वाजून २७ मिनिटे.
विजय मुहूर्त : दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटे ते ०२ वाजून ३८ मिनिटे.
निशिथ काळ : रात्रौ ११ वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे.
गोधुलि मुहूर्त : सायंकाळी ०५ वाजून २३ मिनिटे ते ०५ वाजून ४७ मिनिटे.
अमृत काळ : रात्रौ १० वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ४४ मिनिटे.
आजचे अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी ०३ वाजेपासून ते सायंकाळी ०४ वाजून ३० मिनिटे.
यमगंड : सकाळी ०९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटे.
गुलिक काळ : दुपारी १२ वाजेपासून ते ०१ वाजून ३० मिनिटे.
दुर्मुहूर्त काळ : सकाळी ०८ वाजून ४७ मिनिटे ते ०९ वाजून ३१ मिनिटे आणि रात्रौ १० वाजून ४७ मिनिटे ते ११ वाजून ३९ मिनिटे.
भद्रा काळ : दुपारी ०२ वाजून २१ मिनिटे ते ०३ वाजून २४ मिनिटे.
राशिभविष्य
मेष : कोणत्याही व्यवहारात गाफील राहू नका. सामाजिक कार्य मनोभावे करा. आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असेल. जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. मेहनत व परिश्रम अधिक करावी लागेल. मात्र, कष्टाचे चीज होऊन त्याचा योग्य मोबदला मिळेल. यश व प्रगती साध्य करता येऊ शकेल.
वृषभ : पैशाचे प्रश्न तात्पुरते सुटतील. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. प्रतिस्पर्धी पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. काही समस्यांचा सामना करावा लागेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. हळूहळू यशाचे मार्ग प्रशस्त होतील. नवीन कार्यारंभासाठी अनुकूल कालावधी नाही. कुटुंबासाठी वेळ द्यावा.
मिथुन : मुलांबरोबर चांगला वेळ घालवाल. व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. आजचा दिवस सामान्य असेल. बौद्धिक क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना यशप्राप्ती होईल. व्यवसायिकांना उत्तम दिवस. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. मनोबल उंचावेल. भाग्योदयाचे योग. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करून कार्यरत राहावे.
कर्क : कोणाकडून फसगत होऊ देऊ नका. लोकांसमोर आपले विचार ठाम मांडा. आजचा दिवस शुभ असेल. चांगल्या कामांकडे कल राहील. आपण घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. जनसंपर्कात भर पडेल. दिवसाच्या उत्तरार्धात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. मात्र, संयम आणि धैर्याने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल.
सिंह : नोकरीत अनपेक्षित गोष्टींना सामोरे जावे लागेल. आपले कार्य पूर्ण होईल. आजचा दिवस उत्तम असेल. भाग्याची योग्य साथ मिळेल. विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. चांगल्या कामासाठी पैसे खर्च झाल्याने आनंद होईल. चर्चेच्या माध्यमातून मतभेद संपुष्टात येऊ शकतील. नवीन ओळखीमुळे मन प्रसन्न होईल.
कन्या : दिवसभरात छोटे प्रवास घडतील. प्रतिस्पर्ध्याला आक्रमक बनवू नका. आजचा दिवस शुभ असेल. मन प्रसन्न राहील. भाग्याची भक्कम साथ लाभेल. ज्येष्ठांची सेवा केल्याचे पुण्यप्राप्त होईल. दाम्पत्य जीवन सुखमय असेल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील.
तुळ : आपला करारीपणा आपल्याच उपयोगात येईल. बोलताना शब्दांचा वापर जपून करा. भाग्याची भक्कम साथ लाभेल. अधिकची मेहनत घ्यावी लागेल. मात्र, त्याचा दुपटीने लाभ मिळू शकेल. खर्चात वाढ संभवते. हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल. धावपळ करावी लागेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल.
वृश्चिक : आपला सल्ला लोकांना उपयोगी पडेल. हितचिंतकांच्या संपर्कात याल. आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असू शकेल. नवीन प्रकल्प मिळू शकतील. भाग्याची भक्कम साथ लाभेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील. वरिष्ठ व्यक्तींकडून कौतुक, प्रशंसा होईल.
धनु : आपल्या मतांचा आदर केला जाईल. नोकरी व्यवसायात लक्ष देऊन काम करा. हितशत्रूंच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे लागेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस. विरोधक पराभूत होतील. मन प्रसन्न राहील. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल. चांगल्या गोष्टींसाठी पैसे खर्च होतील.
मकर : माहीत नसलेल्या गोष्टीत डोके घालू नका. आपला पराक्रम सिद्ध करून दाखवा. विशेष फलदायक दिवस. भाग्य वृद्धिंगत होईल. स्पर्धेत विजय प्राप्त करू शकाल. ज्येष्ठ व तज्ज्ञ व्यक्तींच्या गाठी-भेटीचे योग. मन प्रसन्न राहील. मालमत्तेविषयीचा वाद संपुष्टात येऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
कुंभ : घरातील वातावरण शांत ठेवा. नवीन संधी प्राप्त होतील. राशीस्वामी शनीची कृपादृष्टी लाभेल. आपण घेत असलेल्या मेहनतीचे चीज होईल. धनलाभाचे योग आहेत. ज्येष्ठ महिलेचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. रागावर नियंत्रण ठेवावे. मन विचलित होऊ शकेल.
मीन : वाट पहात असलेल्या उत्तराची अपेक्षापूर्ती होईल. जुन्या मित्रांच्या-नातेवाईकांच्या संपर्कात याल. आजचा दिवस शुभ असेल. भाग्याची साथ लाभेल. मिळकतीचे नवे स्रोत उपलब्ध होऊ शकतील. व्यवसायातील गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरेल. उत्तम परतावा मिळू शकेल. विरोधक पराभूत होतील.







