दारु पाजून ३० वर्षीय तरुणीवर बलात्कार

rape-case

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – नागपूर येथे मैत्री केल्यानंतर दारू पाजून ३० वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना गिट्टीखदान भागात घडली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी नीलेश संजय रामटेके (वय ३१, आरबीआय कॉलनी, काटोल रोड, नागपूर) याच्याविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. नीलेश हा अभियंता व कंत्राटदार आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी धरमपेठ भागात राहाते. मार्च २०१८मध्ये तिची नीलेशसोबत फेसबुकवर ओळख झाली. नीलेशने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तरुणीला दारू पाजली. त्यानंतर नीलेश हा तरुणीला घेऊन वेलकम सोसायटी येथे आला. तेथेही तिला दारू पाजली. तरुणी बेशुद्ध झाली. नीलेशने तिच्यावर अत्याचार केला.

 

तरुणी शुद्धीवर आली. तिने नीलेशला जाब विचारला. नीलेशने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तो तिच्यावर अत्याचार करायला लागला. तरुणी गर्भवती राहिली. नीलेशने तिचा गर्भपात केला. काही दिवसांपूर्वी त्याने तरुणीला लग्नास नकार दिला. तरुणीने गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नीलेशचा शोध सुरू केला आहे. नीलेशचे वडील निवृत्त तहसीलदार असल्याचीही चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here