पांझरा नदीपात्रात तहसीलदारांची मध्यरात्री वाळू तस्करांवर धाड

dhule-valu-sand

धुळे (प्रतिनिधी) – कुसुंबा गावालगतच्या पांझरा नदीपात्रात मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास तहसीलदार गायत्री सैंदाणे व प्रथमेश घोलप यांनी स्वत:पथकासह जावून वाळू तस्करांवर कारवाई केली. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून एका विरुध्द गुन्हाही दाखल केला आहे.

 

पांझरा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सैंदाणे व घोलप यांनी कुसुंब्याचे मंडल अधिकारी किरण कांबळे, तलाठी सुनिल कणके, सागर नेमाणे, जितेंद्र चव्हाण यांच्यासह थेट नदीपात्रात जावून कारवाई केली.

 

यात तीन वाहने ताब्यात घेण्यात आली पैकी एक वाहनचालक वाहनासह फरार झाला. त्याच्या विरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणला म्हणून धुळे तालुका पोलिस ठाण्यात भादंवि 353, 379, 511, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मंडल अधिकारी किरण कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here