धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील) – गुरुवार दिनांक 05/11/2020 रोजी धरणगाव तहसील कार्यालय येथे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी यांना covid-19 च्या काळात एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीच्या पगार देण्याकरिता वर्ष 2020 ते 2021(वेतनेवर) ग्रंथ खरेदी खर्च करण्यास विशेष बाब म्हणून शासनाने निधी मंजूर करून द्यावा याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देण्यासाठी तालुक्यातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख व महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे प्र उपप्रमुख पी.एम.पाटील.सर, ग्रंथालय सेनेचे जिल्हा प्र प्रसिद्धीप्रमुख योगेश पी पाटील, अनंत जाधव,रामकृष्ण पाटील,वाल्मीक पाटील,डॉक्टर प्रशांत पाटील,रावसाहेब पाटील,किशोर पाटील,रामकृष्ण मोरे,मनोज पाटील,भगवान कुंभार,डी.ओ.पाटील,रवींद्र पाटील, बापू पाटील,निंबा पाटील,नंदलाल पाटील,विजय पाटील,भगवान पाटील,नंदू खोंडे यांनी निवेदन दिले.







