यावल येथे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घेतला पदभार.

sudhir-patil

यावल (सुरेश पाटील) – येथे पोलिस निरिक्षक म्हणून सुधीर पाटील यांनी आपला पदभार घेतला.येथील तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांची फक्त 10 महीन्याच्या कालावधीत जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील मानव संसाधन विभागात अचानक बदली करण्यात आली.

 

 

त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रभारी अधिकारी म्हणुन फैजपुरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. परंतु दिनांक 5 नोव्हेबंर रोजी यावलच्या पोलीस निरिक्षक पदाची सुत्रे नाशिकहुन आलेल्या पोलिस निरिक्षक सुधिर भिमराव पाटील यांनी स्विकारली आहे.पोलीस निरिक्षक सुधिर भिमराम पाटील हे मुळचे धुळे जिल्ह्यातील रहिवाशी असुन ते नाशिक येथे पोलीस अकेडमीमध्ये कार्यरत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here