मुख्यमंत्री यांनी स्वतः ह्या प्रकरणात लक्ष घालत, अर्णव गोस्वामी यांची सुटका करावी
दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – वर्तमानपत्र, तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाचे कायदेशीर नियम पाळत. जनतेचे विषय जनतेसमोर स्पष्ट मांडत असतांना, महाराष्ट्र सरकारने अलीबाग पोलीसांकडून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले टी.व्ही.चँनलचे पत्रकार श्री अर्णव गोस्वामी यांच्यावर राजनैतीक डाव ठेऊन अटक केल्याच्या निषेधार्थ दोंडाईचा शहर भारतीय जनता पक्षातर्फे नायब तहसिलदार श्री राजेंद्र मोरे यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री प्रविण महाजन यांनी निवेदनातुन सांगितले की, लाँकडाऊन काळात पालघर येथे हिंदु साधुसंत मार्गक्रमण करीत असतांना, विशिष्ट समुदायाच्या लोकांनी नियोजनपूर्वक हल्ला चढवुन. साधुसंतांचा वध महाराष्ट्र पोलीसांसमोर केला. पोलीसांनी यावेळी निव्वळ बघ्याची भुमिका घेतली. यागोष्टीचें इतीवृत्त पत्रकार श्री.अर्णव गोस्वामी यांनी आपल्या वृत्तवाहिनीद्वारे सविस्तर मांडुन. सर्व जगासमोर सत्य परिस्थिती बाहेर आणली. म्हणून हया गोष्टीचा राग महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने ठेवला व श्री.अर्णव गोस्वामी यांना एका जुजबी पुराव्याच्या आधारावर मुंबई येथे अटक करण्यात आली.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्ती स्वातंत्रविषयी घटनेत स्पष्टपणे नमुद केले आहे, कि प्रत्येक देशवासीयांना भारत देशात आपले मत,विचार लोकशाही पद्धतीने व्यक्त करण्याचा,मांडायचा पुर्ण अधिकार आहे. परंतु महाराष्ट्र सरकार त्यावर घाला घालुन, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मिडीयावरच्या लोकांवर चुकीच्या पद्धतीने, जुजबी कार्यवाही करत हल्ला करीत आहे. हे आताच्या श्री अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरून स्पष्ट दिसत आहे. यासर्व घटनेचा भारतीय जनता पक्ष दोंडाईचा शहर तर्फे आम्ही निषेध करतो आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांनी स्वत: ह्या प्रकरणात लक्ष घालून श्री. अर्णव गोस्वामी यांची लवकरात लवकर सुटका करावी, अशा आशयाचे निवेदन आज आम्ही सर्व, मी स्वतः भाजपा शहराध्यक्ष श्री. प्रविण महाजन, सरचिटणीस श्री.जितेंद्र गिरासे,श्री.कृष्णा नगराळे,श्री.भरतरी ठाकुर,श्री.संजय तावडे, श्री.पंकज चौधरी,श्री.कुणाल ठाकुर,श्री.संदीप धनगर आदी निवेदनावर सह्या करत ,प्रत्यक्ष उपस्थित राहत शासनाचे प्रतिनिधी नायब तहसीलदार श्री. राजेंद्र मोरे यांना निवेदन देत आहे.
पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा दोंडाईचा तर्फे निवेदन देताना शहराध्यक्ष श्री प्रविण महाजन, नगरसेवक श्री जितेंद्र गिरासे, श्री कृष्णा नगराळे , श्री.भरतरी ठाकुर , श्री.संजय तावडे, श्री.पंकज चौधरी, श्री.कुणाल ठाकुर आदी छायाचित्रात दिसत आहे…




