दारूच्या नशेत भावाने बहिणीवर केले वार

murder

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – भाऊ दारू पिऊन वडिलांना शिवीगाळ करू लागल्याने त्याला रोखणाऱ्या बहिणीवर तलवारीने वार करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (४ नोव्हेंबर) रात्री शितळानगर, देहू रोड येथे घडला. तबस्सूम रेहमान शेख (वय २१) असे जखमी बहिणीचे नाव आहे.

 

याबाबत देहू रोड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार शाकीर हिदायत शेख (वय २४) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख त्यांच्या माहेरी वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांचा आरोपी भाऊ शाकीर दारू पिऊन घरी आला. त्याने वडिलांना शिवीगाळ केली. त्यामुळे शेख यांनी भावाला वडिलांना शिवीगाळ करण्यापासून रोखले. त्यामुळे चिडलेल्या शाकीर याने शर्टमध्ये लपवलेल्या तलवारीने बहिणीवर वार केले. त्यात शेख जखमी झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here