स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडून अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक

pune-police

पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्याकडून अवैध धंदे यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते .

 

या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले होते . या पथकाने गेल्या काही दिवसांपूर्वी गोपनीय बातमी दारा मार्फत मिळालेल्या बातमी वरून उरुळी कांचन येथे २ सराईता कडून २८ किलो वजनाचा गांजा तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण ८लाख २०हजार रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता पुणे ग्रामिण जिल्ह्यात अशी अवैध्य गांजा ची वाहतूक थांबवण्यासाठी सदरील पथकाने आज दि ६/११/२०२० रोजी मिळलेल्या बातमी वरून भिगवण पोलिस स्टेशन हद्दीत एक टाटा कंपनीची झेस्ट मॉडेल चे सिल्वर रंगाचे चारचाकी वाहन त्याचा नोंदणी क्रमांक एम एच १३सी एस १६२६ या कार मध्ये अवैध रित्या गांजा वाहतूक सोलापूर- पुणे मार्गावरून केली जाणार असल्याची माहिती बातमीदारा मार्फत मिळाली.

 

या माहितीवरून मौजे भादलवाडी हद्दीत सोलापूर पुणे महामार्गावर अकोला फाट्या जवळ सदर पथकाने सापळा रचून मिळलेल्या माहिती वरून सदर वर्णनाची गाडी दिसताच सदरची गाडी ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता गाडीत ड्रायव्हर सीट वर एक इसम बसलेला दिसला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव सचिन कुमार मिरगणे वय 32 वर्षे रा सुभाष नगर चौदा नं शाळे पाठीमागे बार्शी ता बार्शी जि सोलापूर सांगितले . गाडीची पाहणी केली असता मागील सीट वर ३ खाकी रंगाच्या मोठ्या गोण्या मिळून आल्या तसेच सदरील गाडीच्या डिकी मध्ये खाकी रंगाच्या २ मोठ्या गोण्या मिळून आल्या सदरील गोण्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये गांजा नावाचा अंमली पदार्थ मिळून आला

 

या आरोपीकडून ५ लाख 20 हजार रु : रु १५ हजार किलो या प्रमाणे किंमतीचे खाकी गोणीत १६ पाकिटे त्याचे गोणीसह वजन ३४ किलो ७०० ग्रॅम कीं रु अंदाजे, ५ लाख १०हजार रु : एका खाकी गोणीत१५ हजार रु किलो प्रमाणे१६ पाकिटे त्याचे गोणीसह वजन ३४ किलो, ५ लाख २५हजार रु: एका खाकी गोणीत१५ हजार रु किलो प्रमाणे१६ पाकिटे त्याचे गोणीसह वजन ३५ किलो कीं रु अंदाजे, ५ लाख २२ हजार रु: एका खाकी गोणीत१५ हजार रु किलो प्रमाणे१६ पाकिटे त्याचे गोणीसह वजन ३४ किलो८०० ग्रॅम कीं रु अंदाजे, ३ लाख ३३ हजार रु: एका खाकी गोणीत१५ हजार रु किलो प्रमाणे११ पाकिटे त्याचे गोणीसह वजन २२किलो २०० ग्रॅम कीं रु अंदाजे, ४ लाख रु :एक सिल्वर रंगाची टाटा कंपनीची झिस्ट कार क्र एम एच १३सी एस १६२६ जुनी वापरती कीं अंदाजे असा एकूण २८ लाख १० हजार ५००रु मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरीलआरोपी वर गुंगीकारक औषध द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९५८चे कलम ८(क),२०(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमाल सह पुढील तपास कामी भिगवण पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे .सदर आरोपी वर सुर्यपीठ राज्य तेलंगणा येथे 2013 साली गुंगीकारक औषध द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९५८चे कलम ८(क),२०(क) नुसार गुन्हा दाखल आहे

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट तसेच पो.उप निरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा अनिल काळे, पो ना अभिजित एकशिंगे, पो ना विजय कांचन, पो कॉ धिरज जाधव तसेच भिगवण पो स्टे चे पो ना आर आर पठाण, पो कॉ ए एम माने यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here