शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – वाढीव वीज बिल तसेच व्यावसायिकांचे वीज बिल माफ करण्यासाठी शहादा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता किसनसिंग पावरा यांना निवेदन देण्यात आले .
सदर निवेदन देवून ही दखल न घेतल्यास जनआंदोलन छेडण्याचा मनसे कडून इशाराही देण्यात आला आहे .सदर निवेदनात म्हटले आहे की , अभियंत्यांना ग्राहकांना दिलेली वाढीव वीज बिले अन्यायकारक आहेत . कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आले होते . यामुळे सर्वसामान्य जनतेसह व्यापाऱ्यांना घरातच बसावे लागले . या काळात कोणताही रोजगार नसल्याने जनतेकडे पैसाच उपलब्ध झाला नाही.अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
बऱ्याच ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले देण्यात आले आहेत . वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या वीज बिलाबाबतच्या तक्रारी लक्षात न घेता त्यांना उडवा उडवीची उत्तरे देवून वीज बिल भरावेच लागेल असे सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे उद्योग , व्यवसाय ठप्प झाले असल्याने शासनाने वीज ग्राहकांना वाढीव बिल कमी करून दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे . सदर मागणी पूर्ण न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ मोरे , उपाध्यक्ष गोपाल कोळी , सुनिल पाटील , विपुल पटेल , तुषार मराठे , जतीन पटेल गणेश नेरकर आदी उपस्थित होते .
https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/274779850622554/?t=1







