शिरपूर येथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

shivsena-shirpur

शिरपूर (प्रतिनिधी) – शहरात व तालुक्यातील विविध गावांत दि. 08 नोव्हेंबर 2020 रोजी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, धुळे ग्रामणीचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो लोकांनी शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारले.sadasya-nondani-shivsena

 

 

शिरपूर शहर, शिरपूर तालुक्यातील सजगारपाडा, चागडू, नवी बोराडी या ठिकाणी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानांतर्गत कार्यक्रम झाला. यावेळी बोलतांना श्री.साळुंके म्हणाले की, आदिवासी पाडा-वस्त्यांपर्यंत शिवसेना पोहचत आहे. समाजातील सर्व तळागाळातील लोकांपर्यंत जावून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणे, शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचवणे, त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविणे हे काम शिवसेना करीत आहे. जनतेच्या ही समस्या सुटत असून मोठ्या प्रमाणात अनेक नवीन कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहे. ही शिवसेनेच्या कामाची पावतीच आहे, असेही श्री.साळुंके म्हणाले.shirpur-shivsena

 

 

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, शिवसेनेचे धुळे ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हा प्रमुख भगतसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा, तालुका प्रमुख पुर्व दिपक चोरमले, तालुका प्रमुख पश्चिम अत्तरसिंग पावरा, शहर प्रमुख मनोज धनगर, योगेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते.shivsena-sadsya-nondani

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here