नालासोपारा येथे प्रेम प्रकरणातून ५२ वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला

pranghatak-halla

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – नालासोपारा परिसरात एका ५५ वर्षीय प्रियकराने ५२ वर्षीय महिलेवर हल्ला केला आहे. प्रेम प्रकरणातील संबंध तोडल्याने तिच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी प्रियकरावर नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोघेही जखमी असल्याने त्यांचावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा पश्चिमेच्या पांचाळ नगर परिसरात राहणाऱ्या भावना खिमजी नागर (५२) यांची दोन वर्षांपूर्वी आरोपी महेश मोहन रेवर (५५) याच्यासोबत फेसबुक या सोशल मीडियाद्वारे ओळख होऊन मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. पण मागील काही दिवसापासून भावना महेशला टाळत होती. याचा राग मनात धरून शुक्रवारी भावनाच्या घरात घुसून चाकूने गळ्यावर, छातीवर, हातावर आणि पोटावर सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. तर आरोपीनेही त्याच चाकूने स्वतःच्या पोटावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संभाजी मुंडे यांनी माहिती दिली की महिलेला उपचारासाठी जेजे रुग्णालय मुंबई येथे दाखल केले असून तिची प्रकृती ठीक आहे. तर आरोपी महेशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here