शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे संभाजी बिडी या कंपनीची बनावट बिडी विक्री होत असल्याचे गुप्त माहितीनुसार , आय पी इंवेसस्टिंगेशन टीमने सापळा रचून हजोरोंचा माल जप्त केला आहे.
मोतीपुरा भागातील फईम शेख नामक आरोपीवर कॉपीराइट ॲक्ट नुसार कारवाई करून ताब्यात घेण्यात आले, सदर कारवाईत आय पी चे तपास अधिकारी अनिल मोरे यांनी पोलिस अधीक्षक श्री चावरिया यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलिस निरीक्षक नाईकनवरे यांच्या मार्गर्शनाखाली यशस्वी केली. या कारवाई मुळे बनावट माल विक्री करणाऱ्यामध्ये घबराट निर्माण झाली आहे.








