धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – आज दिनांक 10/11/2020 रोजी अमळनेर तहसीलदार कार्यालय येथे महाराष्ट्र ग्रंथालय सेना यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी यांना covid-19 च्या काळात एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीच्या पगार देण्याकरिता वर्ष 2020 ते 2021(वेतनेवर) ग्रंथ खरेदी खर्च करण्यास विशेष बाब म्हणून शासनाने निधी मंजूर करून द्यावा याबाबत तहसीलदार अमळनेर यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले देण्यात आले.
यावेळी निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथालय सेना अमळनेर तालुका यांच्यावतीने तहसीलदार यांना ग्रंथालयाचे विविध मागण्यांचे निवेदन देताना प्रदेश उपप्रमुख पी एम पाटील, डॉ. प्रशांत पाटील जळगाव जिल्हाप्रमुख, श्रीकांत अनिल पाटील तालुकाप्रमुख, योगेश पाटील जिल्हाउपप्रमुख, महेश पाटील तालुक्यातील ,प्रकाश भिका पाटील डि के पाटील प्रभुदास पाटील शशिकांत पाटील, सुनिल पाटील भरत पाटील, शेलकर सर मनोज पाटील राजेंद्र पाटील प्रवीण पाटील महेश देशमुख आदी उपस्थित होते.







