दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – बिहार राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष व जनता दल युनायटेड पक्षाला संयुक्तपणे सत्ता सोपविली.विरोधकांनी अनेक बेछुटपणे बिनबुडाचे आरोप केलेत परंतु बिहारच्या जनतेने जंगलराज पुन्हा येऊ नये म्हणुन विकासाला साथ देत मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे संपुर्ण देशातील विविध राज्यात पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले म्हणुन भारतीय जनता पक्ष दोंडाईचा शहर तर्फे आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध चौकात फटाके वाजवून मिठाई वाटण्यात आली .
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन , उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये , नगरसेवक जितेंद्र गिरासे , कृष्णा नगराळे,भरतरी ठाकुर , किशन दोधेजा ,, चिरंजीव चौधरी ,गिरीधारी रुपचंदानी , शैलेश बोरसे,माजी नगरसेवक सौ चंद्रकला सिसोदिया , जितेंद्र गिरासे ,पंकज चौधरीं , शहाबाज शाह ,सचिन काळकाटे , विजय नाईक ,किशोर नाईक ,योगेश ठाकुर , मेहमुद बागवान ,संजय चंदने ,कुणाल ठाकुर , एकनाथ मराठे , सुनिल शिंदे ,रामकृष्ण बडगुजर ,, रघुनाथ सोनवणे ,भैय्या धनगर ,दिपक नांगरे , नरेंद्र ठाकुर , रविंद्र ईशी ,सुभाष पाटील , यशवंत कागणे इ पदाधिकारी उपस्थित होते .




