गाडी पार्क करण्याच्या वादातून खुनाचा प्रयत्न ८ तासात स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन्ही मुख्य आरोपी जेरबंद

pune-crime

पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – मंगळवार दि१०/११/२०२० रोजी लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत दुपारी सुमारे १२:४५वा च्या दरम्यान वाघोली गाव बकोरी फाटा येथे यातील फिर्यादी नामे सुनिल रामदास गाडे वय 31 वर्षे व्यवसाय गॅरेज रा कॅनरा बँक च्या मागे बायफ रोड वाघोली आज रोजी ते आपले गॅरेज चे येथे आपली गाडी घेऊन आले असता तेथे अगोदर उभा असलेला टेम्पो नोंदणी क्र एम एच१२आर एन ३२२८ यातील चालक आणि फिर्यादी यांचे मध्ये टेम्पो बाजूला काढ न्यावरून किरकोळ भांडण झाले . सदरील टेम्पो चालकाने झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आपले इतर ५ते ६ मित्र फिर्यादी यास मारण्यासाठी त्याठिकाणी बोलवले सदर ठिकाणी 7 ते 8 जणांनी फिर्यादी व त्यांचे भाऊ समीर आणि त्यांचे मित्र यांना कोयते आणि लाकडी दांडक्याने मारण्यास सुरवात केली

 



सदरची भांडणे सोडवण्यास आलेले फिर्यादी यांचे दाजी नामे संतोष सातव यांच्या वर देखिल हल्ला केला भांडण करण्यासाठी आलेल्या इसमा पैकी एका इसमाने आपले कडील गावठी पिस्तुल काढून फिर्यादी यांचे दाजी यांच्या वर २ वेळा फायर केला यामध्ये फिर्यादी यांचे भाऊ समीर आणि मित्र इरफान शेख हे गंभीर रित्या जखमी झाले यावरून लोणीकंद पोलिस स्टेशन गु र नं ९९४/२०२० भा द वि का कलम ३०७, १४३,१४७, १४८, १४९,३२३,५०४,५०६ मुंबई पो अधि कलम ३७(१) (३) भा हत्यार कायदा कलम ३,२५ ४,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील गुन्ह्यातील हल्ला करणारे आरोपी हे अज्ञात असल्याने वरील गुन्हा उघडकीस आणणे कठीण होते .

 


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमी वरून सदर गुन्ह्यातील आरोपी हे हडपसर परिसरात येणार असल्याची माहिती वरून त्याठिकाणी सापळा रचून ऋषभ रामदास शेवाळे (वय २२वर्षे रा शेवाळे वाडी उरुळी देवाची ता हवेली जि पुणे), संकेत सदाशिव पाटील वय २१वर्षे (मूळ रा इरला ता जि उस्मानाबाद सध्या रा श्रेयस डेयरी हंडेवाडी रोड ससाणे नगर हडपसर पुणे) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या आरोपींनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर साथीदार मार्फत केल्याचे सांगत आहेत . सदरील आरोपीपैकी ऋषभ रामदास शेवाळे हा ३ महिन्यांपासून येरवडा कारागृहातून पॅरोल रजेवर सुटलेला आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी लोणीकंद पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे पुढील तपास लोणीकंद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री प्रताप मानकर हे करीत आहेत

 


सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरिक्षक अमोल गोरे, सहा पो फो दत्तात्रय गिरमकर, पो हवा उमाकांत कुंजीर, पो ना विजय कांचन, पो ना जनार्दन शेळके, पो ना राजू मोमिन, पो कॉ धिरज जाधव, पो का समाधान नाईकनवरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here