जळगाव जिल्हा रुग्णालयातून महिलेच्या मृतदेहावरील सोने गायब

jalgaon-civil-hospital

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – येथील जिल्हा कोविड रुग्णालयात सोयगाव तालुक्यातील फर्दापूरच्या महिलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.दि. 10 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर महिलेच्या कानातील रिंग ओढून घेवून गायब केल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनात आले.

 

दरम्यान, याप्रकरणाची समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील रवींद्र माणिक देवकर यांनी जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना लेखी तक्रार दिली आहे. इंदुबाई माणिक देवकर यांना न्युमोनिया झाला असल्याने जिल्हा कोविड रुग्णालायातील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

 

उपचारादरम्यान 10 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सीलबंद केलेला मृतदेह ताब्यात देण्यासाठी आल्यानंतर ही घटना लक्षात आली. इंदूबाईंच्या कानातील सोन्याची 10 ग्रामची रिंग गायब झाली आहे. तरी या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी महिलेच्या कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, वाकोद-पहूर गटाचे जि.प. सदस्य अमित देशमुख यांनी मृत शरीराची विटंबना करणार्‍यांवर कारवाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here