टोळी येथील दलित मुलीवर अन्याय प्रकरणी त्वरित कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन

vanchit-bhaujan-aghadi

शहादा (विजय निकम) – आज दि: 13/11/2020 रोजी शहादा तालुका येथे पारोळा तालुक्यातील टोळी येथील दलित मुलीवर सामुयिक बलात्कार व विष पाजून तिची हत्या करण्यात आली चारही नराधमाना फाशीची शिक्षा देण्यात यावी या बाबत.मा.तहसीलदार व पोलिस निरक्षक यांना वंचित बहूजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 

पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहेत अशा घटना संपुर्ण मानव जातीला काळीमा फासणारी आहे अशीच जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी यां गावातील दलित मुलीवर गावातील तीन नराधमानी सामुदायिक बलात्कार करून व त्याची वाच्यता होऊ नये म्हणून तिला विष पाजून एका मळ्यात फेकुन दिले. पीडित तरुणी ही पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात प्रथम वर्ष विदण्यान शाखेत शिकत होती.महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना मारलं जात आहे बलातत्कार करून संपवले जात आहे समग्र महिलांचे अस्तित्यत्व धोक्यात आले आहे. shahada-nivedan

 

 

राज्यात मोठ्या प्रमाणात हत्याचार होत आहे तरी देखील याच्यावर राज्य सरकार अनदेखा पना करत आहे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी महाराष्ट्रात महिला हत्याकांडवर ठोस भूमिका घेतली गेली नाही तर राज्य भरात तिव्र आंदोलन करण्यात येईल.तसेच या प्रकरणातील आरोपी शिवनंदन शालिक पवार पप्पू अशोक पाटील, अशोक वालजी पाटील यांना मदत करणारी एक महिलाचा समावेश आहे.हे राहानारे टोळी गावातील असून चाहारी आरोपीना तात्काळ अटक करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा पीडित तरुणीच्या परिवाराला संरक्षण मिळावे. या आरोपीना जलगतीने फाशी शिक्षा देण्यात यावी.तसेच मा.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित मुलीचा परिवारला भेट देऊन आर्थिक मदत जाहिर करावी. उत्तर प्रदेश सारखा महाराष्ट्र राज्य होऊ नये याची दखल राज्य सरकारने घ्यावी अन्यथा वंचित बहूजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र जनता राज्य सरकार विरोधात रस्त्यावर उतरेल यांची दखल प्रशासनानी घ्यावी. असे निवेदनात म्हटल आहे.shahada

 

 

निवेदन देतांना शहादा तालुकाध्यक्ष गजेंद्र भाऊ निकुंभे, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष दिनेश भाऊ सामुद्रे, शहादा तालुका उपाध्यक्ष रजिंवी भाऊ मोरे, आबा निकुंभे, अभय बर्डे राज निकुंभे, विनोद पितांबर बिरारे आदी उपस्थित होते.

vanchit-bhaujan-aghadi-nivedan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here