राष्ट्रीय विकलांग पार्टी जिल्हाअध्यक्षपदी पी एम पाटील

p-m-patil

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – राष्ट्रीय विकलांग पार्टी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष के.के. दीक्षित यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनराज गायकवाड यांनी धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष,बुलंद पोलीस टाइम्सचे उपसंपादक पी एम पाटील सर यांची जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

 

विकलांग,तरुण, किन्नर (वृतीयपंथी) विधवा,ज्येष्ठ नागरिक यांच्या न्याय हक्कासाठी सदर पार्टीची स्थापना झाली असून भारतात 13 राज्या मध्ये आर.व्ही.पी. काम करीत असून त्यांनी आता महाराष्ट्रात तिची सुरुवात केली असून या पार्टीत अनेक वरिष्ठ पातळीवरील महिला, पुरुष,तृतीयपंथी काम करीत आहेत.त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचा हक्कासाठी लढा देण्याचे काम राष्ट्रीय विकलांग पार्टीही काम करीत आहे.

 

पी एम पाटील सर हे 25 वर्षां पासून समाजसेवेचे काम करीत असून खास करून दिव्यांग बांधवांसाठी काम करीत आहे त्यांच्या या कामामुळेच त्यांना जळगाव जिल्हा अध्यक्ष पद हे राष्ट्रीय विकलांग पार्टीने दिले.

 

पी एम पाटील सर यांनी सांगितले दिवाळी नंतर जळगाव जिल्ह्यातील ज्या विकलांग बांधवांना त्यांचा न्याय हक्काचे 5 टक्के रक्कम अदयाप पावेतो अनेक ग्रामपंचायती व न.पा. ने दिल्या नाहीत त्या साठी लढा दयावयाचा असून जिल्ह्यात ज्या तरुणांना,ज्येष्ठ नागरिकांना,तृतीयपंथीना, महिलांना विकलांगांना सेवाभावी काम करण्याची इच्छा असेल अशांनी त्वरित संपर्क साधावा अमळनेर व बोदवड या तालुक्यात पार्टीची स्थापना झाली असून इतर तालुक्यात महत्वाची पदे दयावयाची असून 75885 80735 या क्रमांकावर पी एम पाटील सर किंवा 9673357401 संजय पाटील यांच्या शी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश पी पाटील यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here