देशाच्या सुरक्षेसाठी सागरकिनारी लक्ष ठेवा- जयपाल पाटील

jaypal-bodade

उत्तंन (प्रतिनिधी) – सागरी सीमा मंच उत्तंन-भाईंदर ने गावदेवी मंदिरात च्या पटांगणावर आरमार दिन व वसुबारस कार्यक्रम आयोजित केला होता. व्यासपीठावर संतोष सुर्वे सागरी मंचचे प्रांत प्रमुख, सुरेंद्र चंपानेरकर संघ प्रचारक, भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव तथा रायगडभूषण आपत्ती सुरक्षा तज्ञ जयपाल पाटील, भारतीय पत्रकार संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष एस.एस .शेख उपस्थित होते.

 

उपस्थित संघ कार्यकर्ते यांनी गोमाता आणि बछड्याची विधिवत पूजा करून अन्नदान केले. मान्यवरांच्या यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलन केले.gomata-pujan
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय पाटील जिल्हाप्रमुख उत्तंन यांनी करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी आरमार का स्थापन केले त्याचा राज्यासाठी कसा उपयोग केला त्यांची सखोल माहिती संतोष सुर्वे यांनी दिली तर वसुबारस चे महत्व त्याचा लाभ कसा होतो गोमातेला का महत्व दिले जाते याची सखोल माहिती सुरेंद्र चंपानेरकर यांनी दिली.

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयपाल पाटील यांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून हा आरमार व सुबारस दिन साजरा करीत आहोत त्याचे आयोजकांना धन्यवाद दिले आणि महिला आणि मुलांनी सुरक्षितता कशी राखावी याची माहिती देऊन मुंबई धारावी झोपडपट्टी मध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सोबत संघ कार्यकर्त्यांनी कोविड योध्दा म्हणून केलेल्या कार्याची माहिती जागतिक कोविड 19 नियंत्रण समितीने घेऊन जगभरात भारत-महाराष्ट्र चे अभिनंदन केल्याची आठवण उपस्थितांना दिली. सध्याच्या काळात सागरी मंच कार्यकर्त्यांनी आपल्या समुद्रकिनारी चुकूनही काही वस्तू बॅग दिसल्या तर स्थानिक पोलिसाना याची माहिती सुरक्षा साठी त्याची कल्पना देणे हे सभासदांना गरजेचे आहे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला वस्त तर आभार प्रदर्शन हिंदू समाजाचे अध्यक्ष विद्याधर रेवणकर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागरी सीमा मंच भाईंदर जिल्हा सहप्रमुख भगवान पाटील जिल्हाप्रमुख प्रवीण पाटील व संघ कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here