सराईत चोरटे हडपसर पोलिसांच्या जाळ्यात

arrest

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – हडपसर, लोणीकाळभोर, शिवाजीनगर, लोणीकंद आणि दत्तवाडी परिसरात चोरी करणा-या दोघा सराईत चोरट्यांना हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. सनिसिंग पापासिंग दुधानी (वय 19) आणि सोहेल जावेद शेख (वय19 दोघेही रा. हडपसर) अशी त्यांची नावे आहेत. तर एका विधीसंघर्षीत मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

 

त्यांच्याकडून सात घरफोडीचे व पाच वाहन चोरीचे असे तब्बल १२ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून 25 ग्राम सोने, तीन किलो चांदी आणि पाच चारचाकी असा एकूण 29 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

गस्तीवर असताना पोलिस नाईक विनोद शिवले यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, फुरसुंगी गाव येथील महादेव ज्वेलर्स हे दुकान फोडून चांदी चोरी करणारे आरोपी हे म्हाडा कॉलनी मंत्री निवास येथे येणार आहेत. त्यानुसार पथकाने साध्या वेशात सापळा लावला होता. मात्र पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला. दरम्यान पोलिसांनी पाठलाग करत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी हडपसर, लोणीकाळभोर, शिवाजीनगर, लोणीकंद, दत्तवाडी येथील परिसरात चोऱ्या केल्याचे समोर आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here