https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/1456237317915574/?t=1
आकाशवाणी चौकात भरधाव होंडा सिटीला लागली आग; गाडीतील तिघे बालंबाल बचावले…
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – नॅशनल हायवे क्रमांक सहा वर भुसावळ कडून धुळे जाणाऱ्या भरधाव होंडा सिटी कारने अचानक आकाशवाणी चौकातील गतिरोधकाजवळ पेट घेतला. अचानक गाडीने घेतल्यामुळे गाडीतील तिघांनी त्वरित गाडी थांबवून स्वतःचा जीव वाचवला.
आज दुपारी तीन वाजता भुसावळ कडून थोड्या कडे जाणाऱ्या होंडा सिटी कारने आकाशवाणी चौकातील सिग्नलजवळ अचानक पेट घेतला.गाडीतील ड्रायव्हर व इतर दोघे कसेबसे स्वतःचा जीव वाचवत गाडीतुन बाहेर निघाले. 
दुपारच्या वेळेस घडलेल्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी उसळली होती. काही काळ कारमधून आगीचे डोंब बाहेर निघत होते , परंतु काही क्षणातच अग्निशमन दलाची गाडी त्याठिकाणी पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यात आले. परंतु यामुळे बराच काळ वाहनांची गर्दी जमली होती.








