खुलताबाद (बाजार सावंगी प्रतिनिधी मुनीर शाह) – बाजार सावगीत.देशी व विदेशी गावरान दारू सहजा सहजी व गल्लोगल्ली पावलोपावली दारू मिळत असल्याने दारू पिणाऱ्या ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे विशेष म्हणजे बाजार सांगवी पोलिसाकडून कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने नागरिका.सह.महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या अवैध दारू बाबत कुणीतरी आवाज उठवलं तर पोलिसांकडून आर्थिक देवाण-घेवाण करीत थातूरमातूर कारवाई केली जाते मात्र पुन्हा. जैसे थे. परिस्थिती निर्माण होते.
बाजार सावंगी च्या पोलीस चौकी लागतच दारुड्यांचे अड्डे असून पोलिसांसमोरच अवैध दारू विक्री केली जाते.बाजार सावंगी पोलीस व अवैध दारू विक्रेत्यांची छुपी युती व महिन्याकाठी लाखो रुपये हप्ता जमा होत असल्यामुळे गावात विविध ठिकाणी बाजार गल्लीतील मेन मार्केट हॉटेल किराणा दुकान. मांगवाडा. महारवाडा. भीलवाडा. सूतार गलली.अशा विविध ठिकाणीअवैध. दारू विक्री होत आहे व विनापरवाना धाब्यावर बिनधास्त दारू विकत आहे
ही अवैध दारू विक्री लवकरात लवकर बंद करण्यात आले नाही तर माहिती अधिकार प्रतिनिधी मूनीर शाह व बाबाजी भक्त परिवार यांच्यातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.







