राष्ट्रवादी पक्षाचे अँड.भावसार यांच्या आँफीससह कार्यालयावर तोडफोड

attack-on-ncp-office
  • अँड.भावसार वाचले,मध्यस्थी पडलेल्या पोलीसही जखमी
  • माथेफिरूच्या मागे कोणीतरी तिसरी शक्ती असण्याची शक्यता-अँड. भावसार

दोडाईचा (विशेष प्रतिनिधी) – आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ,सव्वा दहावाजेच्या सुमारास सराईत व आता नुकताच जामीनावर सुटलेल्या माथेफिरू इसमाने अँड. एकनाथ भावसार यांच्या राममंदीर जवळील आँफीस तथा राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयावर , महादेवपुराकडून पायी येत असताना, हातात कोयता घेऊन शिवीगाळ करत,कुठे आहे अँड. भावसार, त्याला मी सोडणार नाही, असे म्हणत आँफीसची तोडफोड केली. यावेळी रस्याने जात असलेले पोलीस शिपाई श्री योगेश पाटील हे आवारायला गेले असता. त्यांच्यावरही हत्यारांचे जखम झाली आहे.

 

 

यावेळी घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे अँड. भावसार सकाळी आँफीसवरच होते.मात्र काही कारणास्तव ते कामासाठी शेजारीच असलेले त्यांच्या कुटूंबियांच्या घरी गेले. म्हणून ते बाल बाल बचावले आणि तेवढ्यात ही घटना झाली. यावेळी आँफीसवर फक्त त्यांचा रायटर श्री छोटू सैंदाणे, आशपाक शाह आदी व्यक्ती उपस्थित होते.dondaicha

 

 

यावेळी अँड.एकनाथ भावसार यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना घटनेची कल्पना दिली.तसेच त्यांनी सांगितले की, संबंधित माथेफिरुशी माझे काय वैयक्तिक मतभेद किंवा विवाद नाही. मात्र गावात आमची राजकीय, सामाजिक ताकद वाढत आहे. तेच एखाद्याला सहन होत नसेल.म्हणून आजचा हा हल्ला घडवण्यात आला आहे. याच्यामागे तिसरी शक्ती असण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी आम्ही रितसर पक्षाकडून निषेध नोंदवून तक्रार देणार आहेत.

 

dondaicha-ncp ncp-dondaicha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here