खंडणी न दिल्याने पाळधी येथील हॉटेल मालकाला जबर मारहाण

paldhi-crime

पाळधी (विशेष प्रतिनिधी) – पाळधी नजीक राष्ट्रीय महामार्ग 6 वर तोतला पेट्रोल पंपासमोरील हॉटेल साईनाथ ढाबाचे मालक किरण त्र्यंबक नन्नवरे यांच्यावर काल गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गुंडगे यांनी जबर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात हॉटेल मालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल (देवकर रुग्णालय) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हॉटेल मालकाने खंडणी दिली नसल्याने हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते.

 

प्राप्त माहितीनुसार काल रात्री सात वाजेच्या सुमारास बांभोरी येथील राहुल राजु सपकाळे व त्यांच्यासोबत च्या दोन जणांनी साईनाथ ढाबा येथील घेऊन हॉटेल मालक किरण त्र्यंबक नन्नवरे यांना दर महिन्याला दहा हजार रुपयांची खंडणी मागूनही तू का देत नाही अशी विचारणा करून जेवणाचे बिल न देता मारहाण सुरू केली. काही वेळाने सपकाळे यांनी फोनवरून गावातील पद्माकर नन्नवरे, सोपान नन्नवरे, राजू सपकाळे, रुस्तमजी नन्नवरे व व आणखी सात आठ जणांना बोलवून घेतले. या सर्वांनी मिळून नन्नवरे यांच्यावर जबर हल्ला करून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत केली. यावेळी हल्लेखोरांनी खुर्च्यांची फेकाफेक करून हॉटेलचे नासधुस केली आहे. हल्लेखोरांनी हॉटेलच्या काउंटर मधून दहा ते पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती हॉटेल मालकाने दिली आहे.

 

हा सर्व प्रकार हॉटेल मध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला असून यावेळी हॉटेलमधील ग्राहकांची पळापळ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकाराने हायवेवरील हॉटेल चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात जखमी हॉटेल मालक किरण त्र्यंबकराव नवले यांची भेट घेतली असता, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल राजु सपकाळे, पद्माकर नन्नवरे, सोपान नन्नवरे, राजू सपकाळे, रुस्तमजी नन्नवरे व इतर अनोळखी (सर्व राहणार बांभोरी तालुका धरणगाव) हे मागील काही दिवसापासून हॉटेल चालू ठेवण्यासाठी दरमहा दहा हजार रुपयांची खंडणी मागत होते. मागण्यासाठी काल संबंधितांनी जीवघेणा करून ठाणे वाळूचा धंदा करत असून वाळूच्या ट्रॅक्टरखाली तुला चिरडून मारून टाकू अशी धमकी देतात काउंटर मधून पैसेही लुटून नेले आहेत. या गुंड थोडक्यात कडे मी व माझे कुटुंबीयांच्या जीविताला धोका असून आमच्या जीविताचे संरक्षण करावे अशी मागणी केली आहे.

दरम्यान हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात नवरे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी घटना घडूनही अद्यापपर्यंत दवाखान्यात पोलिसांनी हॉटेल मालकाची जाबजबाब घेतले नसल्याची माहिती मिळाली असुन पोलिसांकडून निश्चितच न्याय मिळेल असा विश्वास हॉटेल मालकाने आमचे प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here