मृतदेहाचा राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास : प्रेयसी, आई आणि नवरा यांना अटक
नवी दिल्ली – आदर्श नगर परिसरात एका व्यापाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या व्यपाऱ्याच्या गर्लफ्रेंडने आई आणि होणाऱ्या नवऱ्यासोबत मिळून प्रियकराची हत्या केल्याचं उघड झालं. इतकंच नाही तर या तिघांनी प्रियकराच्या मृतदेहाचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले आणि ती सुटकेस राजधानी गाडीतून गुजरातच्या भरुचमध्ये फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्याचं नाव नीरज गुप्ता आहे. तो मॉडल टाऊन येथे राहात होता. त्याचा करोल बागमध्ये व्यापार होता. त्याचं ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. नीरज यांच्या पत्नीने गेल्या 14 नोव्हेंबरला ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या बेपत्ता असण्यामागे फैजल नावाच्या महिलेचा हात असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली होती. फैजल ही नीरजच्या ऑफिमध्ये काम करायची.
पोलिसांनी जेव्हा फैजलची चौकशी केली तेव्हा तिने नकार दिला. मात्र, तिच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्स आणि लोकेशनवरुन पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच फैजलने पोलिसांसमोर सर्व कबुल केलं. फैजल आणि नीरजमध्ये यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मात्र, फैजलच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं. जुबेर नावाच्या व्यक्तीशी तिचा साखरपुडाही झाला. जुबेर हा राजधानी ट्रेनच्या पँट्रीमध्ये काम करतो. हे नीरज यांना आवडलं नाही. नीरज यांनी 12 नोव्हेंबरला रागाच्या भरात फैजलच्या घरी जावून तिला मारहाण केली.
यादरम्यान, तिची आई आणि जुबेर तिथेच उपस्थित होता. त्यानंतर या तिघांनी मिळून नीरजची हत्या केली
हत्या केल्यानंतर फैजलने जुबेरसोबत नीरजच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते बॅगमध्ये भरले. जुबेर ते निजामुद्दीन स्टेशनला घेवून गेला. तिथून गोवा जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमधील ट्रेनच्या पँट्रीमध्ये ठेवून मृतदेहाला रस्त्यात गुजरातच्या भरुचमध्ये फेकून दिलं. पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली वीट आणि चाकू हस्तगत करण्यात आले आहेत. तर मृतदेहाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक गुजरातला रवाना झालं आहे.







