अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार; ८ जखमी, आरोपी फरार

american-mall

विस्कॉन्सिन (अमेरिका) – अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात आठ लोक जखमी झाले आहेत. आरोपीने विस्कॉन्सिनमधील वॉवटोसा येथील मॉलमध्ये गोळीबार केला. दरम्यान, महापौर डेनिस मॅकब्रिड यांनी म्हटले आहे की पोलिस येईपर्यंत आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेत गंभीर जखमी कोणी झाला नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

मॉल पुढील माहितीपर्यंत बंद केला गेला आहे. साक्षीदारांचे म्हणणे आहे की त्यांनी गोळीबाराचे १२ आवाज ऐकले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ७५ पोलिस अधिकारी आणि १० रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या.

 

मेफेर मॉलमध्ये झालेल्या या हल्ल्यामागील कारण समजू शकलेले नाही असे पोलिस प्रमुख बॅरी वेबर यांनी नमूद केले. वेबर यांनी पत्रकारांना सांगितले की, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे वय २० ते ४० वर्षांच्या दरम्यान असू शकते. त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here