काशीद समुद्रात बुडणाऱ्या नऊ पर्यटकांना लाईफगार्डकडून जीवनदान

kashid-lifegaurd

गेल्या पंधरा दिवसातील दिवसातील दुसरी घटना

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – पुण्याहून काशीद समुद्रकिनारी आलेले पर्यटक समुद्राची माहिती नसताना पाण्यात पोहण्यास उतरले आणि पाण्याचा अंदाज नाल्याने हे पर्यटक बुडत असल्याचे तेथील जीवरक्षक रोहन खोपकर यांच्या लक्षात आले त्यांनी ताबडतोब आपल्या सहकार्यांना सुचनादेऊन पर्यटकांना वाचवण्यात यश मिळवले.

 

शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता काशिद बिच येथे पुण्याहुन कोकण पर्यटनासाठी आलेल्या तरुण पर्यटकांचे तसेच श्री. गुप्ता परिवारातील 3 सदस्यांचे प्राण खोल समुद्रात बुडत असताना रोहन खोपकर वॉटर स्पोर्ट्स व एड्वेन्चर्सचे लाईफगार्ड कु. भावेश भोईर, श्री. संजय वाघमारे व निखिल शिंदे, राकेश वाघमारे, दिपेश पवार यांनी आपल्या स्पीड बोटीच्या साहाय्याने प्राण वाचले आहे. सदर तरुण पर्यटक हे पुण्यातील नामांकित कंपनी टी.टी.एस मधील इंजिनिअर्स म्हणून काम करणारे असून त्याची अनुक्रमे नावे सत्यम कुमार वय वर्षे (21), सुमित बोरकर (20), अनिरुद्ध गायकवाड (20), नीरज कुमार (24), स्वाती लोणकर (19) व कुमारी परिसिला गुप्ता (15) ही विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असून यांच्या परिवारातील इतर 3 सदस्यांना सुद्धा बुडताना वाचविण्यात आले, जीवनदान मिळाल्यामुळे त्यांनी काशिद बिच वॉटर स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांचे व श्री. रोहन खोपकर यांच्या संपूर्ण वॉटर स्पोर्ट्स टीमचे मन:पूर्वक आभार मानले.

 

पर्यटक हे पुण्यातील टी टी ऐस कंपनीतील इंजिनिअर आहेत पर्यटकांनी पाण्यात उतरू नये असे वेळोवेळी रोहन खोपकर आणि टीम सांगत असते परंतु कोणीही ऐकत नाहीत,असे रोहन खोपकर यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले.rohan-khopkar-lifegaurd

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here