मुंबई (चित्रपट विभाग प्रतिनिधी सचिन देसाई) – बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणाऱ्या जरीन खानने वर्कआऊट करताना आपला खास अंदाज दाखवला आहे. सध्या बॉलिवूडमध्ये तिच्या वर्कआऊटची चर्चा चांगली रंगली आहे.
जरीन खानने आपल्या इन्स्टग्राम अकाऊंटवर वर्कआऊटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये वर्कआऊट करताना पाहायला मिळत आहे. हातात डंबेल्स घेऊन वर्कआऊट करताना तिने काळ्या रंगाचा टीशर्ट आणि करड्या रंगाची टाइट्स वर्कआऊटसाठी परिधान केली आहे.व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हिडिओला आत्तापर्यंत ९८ हजारापेक्षा अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करतेवेळेस तिने आपल्या चाहत्यांना याबद्दल तुमचा विचार काय आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. अभिनेत्री कतरीना कैफ सारखी दिसते म्हणून जरीनची बरीच चर्चा झाली होती. जरीन बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून जरीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कॅटरिना कैफसारखी दिसते म्हणून जरीनला ‘वीर’ चित्रपट मिळाला होता. ‘हाऊसफूल २’, ‘हेट स्टोरी ३’ या सिनेमातही ती दिसली होती.







